Gurudev Ranade; Life &Philosophy

Saturday, August 29, 2015

ॐ नमो जी आद्या| वेद प्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा ||१-१||
अर्थ:भगवंता ! ज्या तुझे ॐ हे मंगलकारक नाम आहे ,जो तू सर्व कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारणरूपाने असतोस, वेदांनी ज्या तुझे एकाचेच अनेक रूपांनी वर्णन केले आहे, जो तू स्वसंवेद्य म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा असून , दुसर्या कशानेही जाणला जाऊ शकत नाहीस,ज्या तुझा स्वसंवेद्य (सच्चिदानंद) रूपाने जयजयकार असून जो तू सर्व जीवांचे ठिकाणी आत्म्स्वृपानेही आहेस,त्या तुला नमस्कार करतो.||१-१||
विवरण:मंगलाचरण-ग्रंथारंभी भगवंताचे मंगलाचरण करावे असा शिष्टसंप्रदाय आहे.वेदादी वैदिक वांग्मय प्रमाण मानणाऱ्या लोकांना शिष्ट म्हणतात.मंगलाचरण ३ प्रकारचे असते-पहिले वास्तुनिर्देशरूप, दुसरे नमस्कार रूप व तिसरे आशीर्वादरूप मंगलाचरण.माउलींनी इथे तिन्ही प्रकारचे मंगलाचरण केले आहे.
ॐकार:नामरूपरहित ब्रम्हवस्तू अत्यंत सूक्ष्म व बुद्ध्यादिकांच्या पलीकडे असल्यामुळे, ती बुद्ध्यादिक वृत्तीने ग्रहण केली जात नाही. म्हणून ज्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म असा अरुंधतीचा तारा दाखविण्याकरता प्रथम अरुंधतीच्या ताऱ्याजवळ असलेला असा वसिष्टांचा तारा दाखविला जातो,त्याप्रमाणे नामरूप रहित निर्गुण ब्रम्हरूप वस्तू अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिच्या साक्षात्काराकरता शाश्राने स्थूल अशा ॐकाराला त्या ब्रम्हवस्तूचे वाचक (नाव) ठरविले आहे.व त्या ॐकाराचे ठिकाणी ब्रम्हभावना दृढ करून पुढे ॐकार अनुच्चारित झाला असता जीव ब्रम्हस्वरूप होतो.
ओंकारश्‍चाथ शब्‍दश्‍च द्वावेतौ ब्रम्‍हण: पुरा ।
कंठं भित्‍वा विनिर्यातौ तेन माड गि‍लकावुभौ ।।
'ॐ' कार व 'अथ' हे दोन शब्द ब्रम्हदेवाच्या कंठातून प्रथमच बाहेर पडले,त्यामुळे हे दोन्ही शब्द स्वभावतः मंगलकारक आहेत या अर्थाची वरील स्मृती आहे.याप्रमाणे ॐकार हा शब्द परमेश्वराचा वाचक व मंगलकारक असल्यामुळे माउलींनी ॐकार द्वारा सगुण व निर्गुण परब्रम्हाचे एकत्र मंगलाचरण केले आहे.
यापुढच्या पोस्टमध्ये आद्या,वेदप्रतिपाद्या,नमो,स्वसंवेद्या,आत्मरुपा, यावर बोलू.
माउली ज्ञानेश्वर महाराज कि जय्य्य!!

ज्ञानेश्वरी | भावार्थदीपिका's photo.
  





आजि श्रवणेंद्रियां पाहलें| जें येणें गीतानिधान देखिलें| आतां स्वप्नचि हें तुकलें| साचासरिसें ||४-१||
अर्थ:आता या श्रावनेन्द्रीयाने आज गीतेसारखा अमोल ठेवा पहिला ,म्हणून परमसुखाची सकाळ झाली व स्वप्नासारखे असलेले जगात सत्य वाटू लागले.||४-१||
विवरण:कानाने जे खरोखर आईकायला पाहिजे ते ऐकिले. समर्थ म्हणतात,"आता असो हे बोलणे|जयासी स्वहित करणे|तेणे सदा विचरणे |अद्वैतग्रंथी||२६|| जेणे परमार्थ वाढे|अंगी अनुताप चढे|भक्तिसाधन आवडे|त्या नाव ग्रंथ||३०||जेणे होय उपरती|अवगुण पालटती |जेणे चुके...

ज्ञानेश्वरी | भावार्थदीपिका's photo.







आज 'गीताजयंती' असल्याने आजच्या दिवशी अशा ओव्याचा अभ्यास करू कि ज्यामध्ये गीतामातेची थोरवी सांगितलेली आहे.
या गीतार्थाची थोरी| स्वयें शंभू विवरी| जेथ भवानी प्रश्नु करी| चमत्कारौनि ||१-७०||
तेथ हरु म्हणे नेणिजे| देवी जैसें कां स्वरूप तुझें| तैसें हें नित्य नूतन देखिजे| गीतातत्व ||१-७१||
अर्थ:असे हे 'अतिगंभीर व सूक्ष्म निर्विकल्प ब्रह्म' गीतेचा अर्थ आहे.त्या गीतार्थाची थोरवी भगवान शंकर कथन करीत असताना देवी पार्वतीला आश्चर्य वाटून ,त्याविषयी तिने शंकराला प्रश्न केला.||१-७०||शंकर ...

ज्ञानेश्वरी | भावार्थदीपिका's photo.







ज्ञानेश्वरांनी गीतेचे अगाध तत्व सोप्या भाषेत यावे म्हणून तिच्यावर टीका केली.'टीका केली' म्हणजे भाषांतरित केली.गीतेत जसे १८ अध्याय आहेत तसेच ज्ञानेश्वरीतही १८ च अध्याय आहेत.आता प्रत्येक अध्यायात काय काय सांगितले आहे याच्यावर सारांशरूपाने एक कटाक्ष टाकून पाहू.
अध्याय १
अर्जुनाच्या मनात आपल्या नातेवाइकांविरुद्ध लढण्याच्या विचाराने मोह निर्माण झाला त्याचे विवरण.
..

ज्ञानेश्वरी | भावार्थदीपिका's photo.

anandjoshi at 8:33 PM No comments:

anandjoshi at 8:25 PM No comments:
GANPATRAO KANNUR MAHARAJ

anandjoshi at 8:20 PM No comments:

anandjoshi at 5:18 PM No comments:

anandjoshi at 5:01 PM No comments:

anandjoshi at 10:17 AM No comments:

Friday, August 28, 2015


anandjoshi at 1:33 AM No comments:

Thursday, August 27, 2015


anandjoshi at 2:08 AM No comments:

Monday, August 24, 2015


anandjoshi at 5:30 PM No comments:

anandjoshi at 5:20 PM No comments:

anandjoshi at 5:19 PM No comments:

anandjoshi at 5:13 PM No comments:

anandjoshi at 4:25 PM No comments:

Friday, August 21, 2015

dhabyacha maruti sajjangad
anandjoshi at 7:36 PM No comments:
NIMBAL
anandjoshi at 6:24 PM No comments:

anandjoshi at 6:18 PM No comments:

anandjoshi at 6:16 PM No comments:

anandjoshi at 5:57 PM No comments:

anandjoshi at 5:34 PM No comments:

anandjoshi at 5:32 PM No comments:

anandjoshi at 5:17 PM No comments:

anandjoshi at 5:16 PM No comments:

Thursday, August 20, 2015

भज गोविन्दम ॥2||


      ॥ भज गोविन्दम-२॥     
मूढ जहीहि धनागमत्रुष्णाम।कुरू सदबुध्दि मनसि वित्रुष्णाम ॥
यल्लभसे निजकर्मोपात्तं । वित्तं तेन विनोदय चित्तम ॥२॥
भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम  मुढमते॥ध्रु॥
अर्थ:- आचार्य या श्लोकाच्या आरंभालाच "मूढ" शब्दाने सुरवात करतात. मुर्ख लोक हे अद्न्यानी असतात , सकाम असतात त्यांना धनाची संपत्तीची हाव असते. सारासार विचार त्यांच्या ठिकाणी नसतो.आशा लोकांना आचार्य म्हणतात "हे मुर्खा ! (अद्न्यानी) हि धनत्रुष्णा तु सोडुन दे  ! मनात सद्बुध्दि सतत राहावी  व या वित्रुष्णेपासून दुर राहा आणि जे तुझ्या कर्माने तुला मिळेल त्यात तु समाधानी रहा.
 भावगंध :- मुढ शब्दाचा पातंजल योगशास्रामधे अर्थ दिलेला आहे.त्यात चित्ताचे- क्षिप्त चित्त,विक्षिप्त चित्त, निरुध्द चित्त, एकाग्र चित्त, चंचल चित्त, मुढ चित्त असे प्रकार सांगितले आहेत." मुढ" चित्त म्हणजे ‘तमोगुणाने व्यप्त’ असलेले चित्त.अशा चित्ताच्या माणसाला झोप जास्त असते." किर्तनी बसता निद्रे नागविले । मन हे गुंतले विषयसुखा ॥ना.म.॥ मुढ चित्ताच्या व्यक्तिला श्रवणात गोडि उत्पन्न होत नाहि. पण प्रापंचीक गप्पा, पॆशाची चर्चा निघाल्या कि मग मात्र हा सावध होतो. धनाचा लोभ त्याला स्वस्थ बसू देत नाहि. श्रीमदभागवत ११वा स्कंधामधे कदर्यु आख्यान आहे. हि कदर्यु ब्राह्मण इतका कंजुस असतो की त्याच्या घरातधान्याचे कोठारे भरलेली असुनहि  मुंगीला उपवास , उंदराला लंघन घडत होते.घरच्या लोकांना ताजे अन्नहि मिळु देत नव्हता एव्हढा धनलोभी होता. कालाच्या ओघात त्याचे होत्याचे नव्हते झाले व नंतर त्याला विरक्ति झाली व त्याने त्याने धनाचे नश्वरत्व सांगितले . तो म्हणतो धनाच्या मागे १५ अनर्थ आहेत .काम. क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर आदी अनेक विकार फक्त धनामुळे येतात. ज्याच्याजवळ धन असते असा मनुष्य अतिशय अहंकारि असतो त्याला वाटते तो धनाच्या बळावर काहिहि प्रप्त करू शकतो जगद्गुरू श्री तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात " धनमान बळे नाठविसी देवा ।म्रुत्युकाळी तेव्हा कोण आहे ॥" किंवा तुका म्हणे धन ।धनासाठी देती प्राण ॥ धन मिळविण्यासाठी नरबळी दिल्याच्या घटना आपण पेपरमध्ये वाचतो. आता भरपुर पॆसे मिळाले असे कधीच कोणाला वाटत नाहि.
                  धन दारा पुत्र जन । बंधु सोयरे पिशुन ।सर्व मिथ्या हे जाणुन । शरण रिघा देवासी॥ ना.म.।
हे सर्व मिथ्या "जाणुन" या शब्दाला महत्व आहे, धन टाकायचे नाही तर ते मिथ्या, नष्ट होणारे आहे असे जाणुन त्याचा विनियोग करायचा. "वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥" त.म. अशा पध्द्तीने धनाचा वापर केला तर ते धन तारक ठरते नाहि तर तेच धन मारक ठरते.
 "म्हणे आजि मिया । संपत्ती बहुतेकाचिया । आपुल्या हाती केलिया। धन्य ना मी ॥ माउली॥ धनत्रुष्णा मोठि वाईट आहे. असा माणुस कंजुस असतो विधायक कामासाठि कधी वर्गणिही देणार नाहि उलट "उष्ट्या हाते नुडवी काग ॥" उष्ट्या हाताने तो कावळा सुध्दा उड्वीत नाही कारण हातातील शिते जर कावळ्याला मिळाले तर ?!!! 
              येथे येउनि केलेसी कायी । विठ्ठ्लु नाहि आठविला ॥१॥
               अहा रे मुढा  भाग्यहिना। गेलासी पतना मोह भ्रमे ॥२॥
            तात्पर्य अशा व्यक्तीला मुढ म्हणतात. म्हणुन आचार्य फार सुंदर उपाय सांगतात. ते म्हणतात अरे! जीवा तु मनात सद्बुध्दी , विरक्ति, निराभिलाषी होण्याचा प्रयत्न कर.व्यवहार सोडायला ते सांगत नाहित फक्त अलिप्तपणे व्यवहार करायला सांगतात."पद्मपत्रमिवांभसा " कमळाचे पान पाण्यात असते परंतु ते त्या पाण्यात लिप्त होत नाहि. "मग मी व्यवाहारी असेन वर्तत । जेवी जळाआत पद्मपत्र ॥तु.म.॥   ह्याप्रमाणे जीवनात राहिले तर समाधान प्राप्त होते.
              प्रतेकाला त्याच्या कर्मानुसार फल मिळत असते. " मना त्वाचि रे पुर्व संचित केले । तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ श्री रामदास स्वामी ॥  कर्मानुसार संचित होते व संचितच पूढे प्रारब्ध म्हणुन भोगायला प्राप्त होते. प्रारब्धेचि जोडे धन । प्राब्धेचि वाढे मान ॥ १॥ प्रारब्धेचि भरे पोट । तुका करिना बोभाट ॥  ज्याप्रमाणे आपण कर्म करु त्याप्रमाणे जर घडत असेल तर आता दोष कोणाला द्यावा? म्हणुन "तुका म्हणे आता देवा का रुसावे । मनासि पुसावे काय केले ?॥" 
               कलियुगात सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण . शुध्द चित्त करुन जर  नामभक्ति केलि तर सहज अत्यंतिक समाधान प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो.म्हणुन" ठेविले अनंते तॆसेची राहावे । चित्ती असु द्यावे समाधान" ॥ हे श्री तुकाराम महाराजांचे म्हणने किती सार्थ आहे हे पटते. संतांनी जगाला आळसी न बनवता मानसीक समाधान(Satisfaction of mind) कसे प्राप्त करावे हे सांगीतले व सुखी संसाराची गुरूकिल्ली आपल्या हातात दिली आहे. 
Posted by ashokanand at 
anandjoshi at 2:49 AM No comments:
GURUDEV
anandjoshi at 2:48 AM No comments:

anandjoshi at 2:45 AM No comments:

anandjoshi at 2:45 AM No comments:

anandjoshi at 2:13 AM No comments:

Wednesday, August 19, 2015


anandjoshi at 3:55 AM No comments:

Tuesday, August 18, 2015

BABA
anandjoshi at 9:49 AM No comments:
BABA
anandjoshi at 9:23 AM No comments:
BABA
anandjoshi at 8:54 AM No comments:
BABA
anandjoshi at 8:45 AM No comments:
BABA
anandjoshi at 8:19 AM No comments:
BABA
anandjoshi at 8:03 AM No comments:
BABA
anandjoshi at 7:49 AM No comments:
BABA
anandjoshi at 7:42 AM No comments:
BABA
anandjoshi at 7:35 AM No comments:
BABA
anandjoshi at 7:25 AM No comments:
BABA
anandjoshi at 7:23 AM No comments:
AMBURAO MAHARAJ MATH

anandjoshi at 7:17 AM No comments:

Monday, August 17, 2015

BABA
anandjoshi at 10:11 AM No comments:
BABA
anandjoshi at 9:54 AM No comments:
BABA
anandjoshi at 9:05 AM No comments:
BABA
anandjoshi at 7:54 AM No comments:
KALYANSWAMI
anandjoshi at 6:51 AM No comments:

anandjoshi at 6:39 AM No comments:
‹
›
Home
View web version

About Me

My photo
anandjoshi
View my complete profile
Powered by Blogger.