Gurudev Ranade; Life &Philosophy

Saturday, August 29, 2015

ॐ नमो जी आद्या| वेद प्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा ||१-१||
अर्थ:भगवंता ! ज्या तुझे ॐ हे मंगलकारक नाम आहे ,जो तू सर्व कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारणरूपाने असतोस, वेदांनी ज्या तुझे एकाचेच अनेक रूपांनी वर्णन केले आहे, जो तू स्वसंवेद्य म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा असून , दुसर्या कशानेही जाणला जाऊ शकत नाहीस,ज्या तुझा स्वसंवेद्य (सच्चिदानंद) रूपाने जयजयकार असून जो तू सर्व जीवांचे ठिकाणी आत्म्स्वृपानेही आहेस,त्या तुला नमस्कार करतो.||१-१||
विवरण:मंगलाचरण-ग्रंथारंभी भगवंताचे मंगलाचरण करावे असा शिष्टसंप्रदाय आहे.वेदादी वैदिक वांग्मय प्रमाण मानणाऱ्या लोकांना शिष्ट म्हणतात.मंगलाचरण ३ प्रकारचे असते-पहिले वास्तुनिर्देशरूप, दुसरे नमस्कार रूप व तिसरे आशीर्वादरूप मंगलाचरण.माउलींनी इथे तिन्ही प्रकारचे मंगलाचरण केले आहे.
ॐकार:नामरूपरहित ब्रम्हवस्तू अत्यंत सूक्ष्म व बुद्ध्यादिकांच्या पलीकडे असल्यामुळे, ती बुद्ध्यादिक वृत्तीने ग्रहण केली जात नाही. म्हणून ज्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म असा अरुंधतीचा तारा दाखविण्याकरता प्रथम अरुंधतीच्या ताऱ्याजवळ असलेला असा वसिष्टांचा तारा दाखविला जातो,त्याप्रमाणे नामरूप रहित निर्गुण ब्रम्हरूप वस्तू अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिच्या साक्षात्काराकरता शाश्राने स्थूल अशा ॐकाराला त्या ब्रम्हवस्तूचे वाचक (नाव) ठरविले आहे.व त्या ॐकाराचे ठिकाणी ब्रम्हभावना दृढ करून पुढे ॐकार अनुच्चारित झाला असता जीव ब्रम्हस्वरूप होतो.
ओंकारश्‍चाथ शब्‍दश्‍च द्वावेतौ ब्रम्‍हण: पुरा ।
कंठं भित्‍वा विनिर्यातौ तेन माड गि‍लकावुभौ ।।
'ॐ' कार व 'अथ' हे दोन शब्द ब्रम्हदेवाच्या कंठातून प्रथमच बाहेर पडले,त्यामुळे हे दोन्ही शब्द स्वभावतः मंगलकारक आहेत या अर्थाची वरील स्मृती आहे.याप्रमाणे ॐकार हा शब्द परमेश्वराचा वाचक व मंगलकारक असल्यामुळे माउलींनी ॐकार द्वारा सगुण व निर्गुण परब्रम्हाचे एकत्र मंगलाचरण केले आहे.
यापुढच्या पोस्टमध्ये आद्या,वेदप्रतिपाद्या,नमो,स्वसंवेद्या,आत्मरुपा, यावर बोलू.
माउली ज्ञानेश्वर महाराज कि जय्य्य!!

ज्ञानेश्वरी | भावार्थदीपिका's photo.
  





आजि श्रवणेंद्रियां पाहलें| जें येणें गीतानिधान देखिलें| आतां स्वप्नचि हें तुकलें| साचासरिसें ||४-१||
अर्थ:आता या श्रावनेन्द्रीयाने आज गीतेसारखा अमोल ठेवा पहिला ,म्हणून परमसुखाची सकाळ झाली व स्वप्नासारखे असलेले जगात सत्य वाटू लागले.||४-१||
विवरण:कानाने जे खरोखर आईकायला पाहिजे ते ऐकिले. समर्थ म्हणतात,"आता असो हे बोलणे|जयासी स्वहित करणे|तेणे सदा विचरणे |अद्वैतग्रंथी||२६|| जेणे परमार्थ वाढे|अंगी अनुताप चढे|भक्तिसाधन आवडे|त्या नाव ग्रंथ||३०||जेणे होय उपरती|अवगुण पालटती |जेणे चुके...

ज्ञानेश्वरी | भावार्थदीपिका's photo.







आज 'गीताजयंती' असल्याने आजच्या दिवशी अशा ओव्याचा अभ्यास करू कि ज्यामध्ये गीतामातेची थोरवी सांगितलेली आहे.
या गीतार्थाची थोरी| स्वयें शंभू विवरी| जेथ भवानी प्रश्नु करी| चमत्कारौनि ||१-७०||
तेथ हरु म्हणे नेणिजे| देवी जैसें कां स्वरूप तुझें| तैसें हें नित्य नूतन देखिजे| गीतातत्व ||१-७१||
अर्थ:असे हे 'अतिगंभीर व सूक्ष्म निर्विकल्प ब्रह्म' गीतेचा अर्थ आहे.त्या गीतार्थाची थोरवी भगवान शंकर कथन करीत असताना देवी पार्वतीला आश्चर्य वाटून ,त्याविषयी तिने शंकराला प्रश्न केला.||१-७०||शंकर ...

ज्ञानेश्वरी | भावार्थदीपिका's photo.







ज्ञानेश्वरांनी गीतेचे अगाध तत्व सोप्या भाषेत यावे म्हणून तिच्यावर टीका केली.'टीका केली' म्हणजे भाषांतरित केली.गीतेत जसे १८ अध्याय आहेत तसेच ज्ञानेश्वरीतही १८ च अध्याय आहेत.आता प्रत्येक अध्यायात काय काय सांगितले आहे याच्यावर सारांशरूपाने एक कटाक्ष टाकून पाहू.
अध्याय १
अर्जुनाच्या मनात आपल्या नातेवाइकांविरुद्ध लढण्याच्या विचाराने मोह निर्माण झाला त्याचे विवरण.
..

ज्ञानेश्वरी | भावार्थदीपिका's photo.

anandjoshi at 8:33 PM

No comments:

Post a Comment

‹
›
Home
View web version

About Me

My photo
anandjoshi
View my complete profile
Powered by Blogger.