Monday, April 29, 2024

Wednesday, March 13, 2024

Thursday, March 7, 2024

Saturday, October 1, 2022

आपण सर्व साधक श्री गुरूदेवांचा हा फोटो पूजेला ठेवतो. त्या मागचे कारण इथे मांडतोय श्री गुरुदेवांच्या अमृत मोहत्सवाच्या वेळेला साधकांनी श्री गुरुदेवांना फोटो काढण्याविषयी आग्रह केला.त्यावर गुरुदेवांनी दोन गोष्टी सांगितल्या १ फोटो ग्राफर नाम धारक असला पाहिजे. २ त्या फोटो मधील एक फोटो माझा असेल ( मी निवडणार) त्यानुसार मंडळीनी फोटो काढले. व नंतर ते श्री गुरुदेवांना दाखवले! श्री गुरुदेवांनी विचारले कोणता फोटो निवडला, तर वेगळाच फोटो दाखवला.श्री गुरुदेवांनी हा फोटो निवडला.त्यानंतर उमाताई तेंडूलकर(श्री शंकररावांच्या पत्नी ) यांनी हा फोटो सोबत घेतला होता. तेव्हा श्री गुरुदेवांनी सांगितले," हा फोटो ठेऊन आरती कर. या फोटोमध्ये मी आहे." त्यानंतर पुण्यात जेव्हा पूर आलेला तेव्हा नारायण पेठेतील श्री. शंकरराव तेंडूलकरांच्या घरातील प्रत्येक गोष्ट चिखल मातीने बरबटली परंतु हा फोटो जसाच्या तसा राहिला. नंतर अनेक दिवस साधक हा फोटोच्या दर्शनासाठी येत असत.(सदर आठवण डॉक्टर अनिलकुमार कुलकर्णी यांनी प्रवचनातून सांगितली आहे

Tuesday, July 19, 2022