Friday, October 4, 2024
| लक्ष्मण भटजी निंबरगी I वे . शा . सं . लक्ष्मण भटजी हे मूळचे जमखंडीचे , श्री
महाराजांचे नामधारक , श्री अंबुराव महाराज व श्री गुरूदेवांचे गुरुबंधु . अतिशय
विदवान , अत्यंत बुध्दी मान , सत्शील . श्री महाराजांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम व
त्यांच्याशी जवळचे संबंध होते . श्री गुरुदेवाना श्री महाराजाना कांही विचारायचे
असेल तर ते भटजींच्या मार्फत विचारीत . त्यांचा आवाज फार गोड होता व ते पदे फार
उत्तम म्हणत . संप्रदायातील अनेक घटना त्याना माहीत होत्या . ते सतत नामस्मरणात
रहात असल्याने त्याना कोणी विचारले तर ते नुसते " हुं " म्हणत . श्री महाराजांची व
श्री अंबुराव महाराजांची प्रवचने त्यानी बरीच वर्षे ऐकली होती. त्यांच्या बरोबर ते
पारमार्थिक दौऱ्यावर जात. पोथिवाचनाचे काम ते करीत असत त्यामुळे त्या दोघांच्या
निर्याणानंतर, त्यांच्याच शब्दात त्याच पध्दतीने ते दासबोधाचे विवरण करीत .
उदाहरणार्थ ," दासबोधातील " नित्यनेम प्रातःकाळी , माध्यान काळी , सायंकाळी सर्व
काळी नामस्मरण करावे म्हणजे या तिन्ही वेळा कट्टाचे साधन करावे व उर लेल्या वेळी
नामस्मरण करीत जावे यावर भर देत असत . तुकारामांचा अभंग " सगुण हे ब्रह्म ,
विठ्ठलची बोले , सगुण म्हणजे सहजी , २१६०० श्वासात सद्गुरुनी दिलेले नाम निरंतर
चालावे म्हणजे तुम्ही सगुण-सहजी ब्रम्ह व्हाल . तुमचा जीवभाव जाऊन शीव भाव होईल ,
तुम्ही अभंग व्हाल . श्री भटजीनी एकदा श्री महाराजाना आपला अनुभव सांगीतला "
साधनामधे आपल्याला एक चैत्यन्ययुक्त अशी थैली दिसते , तेंव्हा असेच साधन केल्यास ती
थैली मोकळी होऊन त्यात मुख दिसेल . भटजींची पारमार्थिक योग्यता फार मोठी होती .
रात्रीचे भजन झाल्यावर श्री अंबुराव महाराज व भटजी आत्मज्ञानाच्या व आत्मानुभवाच्या
गोष्टी बोलत बसत . श्री गुरुदेव त्याना निंबाळ येथे वारंवार बोलाऊन घेत व निरुपण
करण्यास सांगत व स्वतः त्यांच्या पुढे बसुन प्रेमाने ऐकत . श्री गुरुदेवांच्या
निर्याणानंतर मंगळवार ता १८ जुन १९५७ दुपारी १२ वाजता दहन भूमीवर त्यांच्या हस्ते
औदुंबराचे रोप लावण्यात आले . श्री गुरुदेवांच्या समाधीची स्थापना शास्त्रोक्त
मंत्रोच्चाराच्या घोषात विधि पूर्वक भटजींच्या हस्ते करण्यात आली , श्री
गुरुदेवांच्या ईच्छेनुसार निंबाळ येथे असलेल्या पादुकांची विधिवत् स्थापना श्री
भटजींच्या हस्ते अश्विन वद्य पंचमीस श्री क्षेत्र उमदी येथे श्री महाराजांच्या
वाडयात करण्यात आली . .....*
Subscribe to:
Posts (Atom)