"जय मंगलम नित्य शुभ मंगलम" (भाग ४)
मागील तीन दिवस आपण व्यासराजस्वामींनी मध्वाचार्यांवर लिहीलेले मंगलम पाहत आहोत त्याचा आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी समारोपाचा भाग पाहणार आहोत.
वायुदेवांचे तीनही अवतार विलक्षण आहेत. पहिल्या अवतारात हनुमंत असताना ब्रह्मचर्य आणि पौरूष. दुसऱ्या भीमसेन अवतारात पौरूष आणि गृहस्थ आणि मध्वाचार्य असताना ब्रह्मचर्य, संन्यास, शुद्ध वेदांत. तीनही अवतारात वेगवेगळे कार्य करून दाखवले. पण असे असतानाच शक्ती, युक्ती, भक्ती या तीन गुणांचे मिश्रण तीनही अवतारात सारखेच पहावयास मिळते.
श्रीमदाचार्यांच्या चरित्रातून शिकण्यासारखे पुष्कळ आहे. मत-मतांतरे, गैरसमज, चुकीच्या समजुती यामुळेच आचार्यांचे चरित्र भारतीय जनमानसात शुद्ध, योग्य रितीने पोहोचू शकले नाही. आणि हे आपलेच दुर्भाग्य म्हणावे लागेल. परदेशामधील व्यक्तींना जी आस्था त्याहीपेक्षा जिज्ञासा आचार्यांबद्दल वाटते ती, आचार्यांनी शक्ती, युक्ती आणि भक्ती प्रसारासाठी ज्या भारत भूमीवर दोनदा भ्रमण केले त्या भूमीतील लोकांमध्येच आज नाही.
मध्वाचार्यांनी केवळ हिंदु धर्मातील तत्त्वज्ञान समजून घेऊन, अनुभवून त्याचा प्रसार केला नाही तर इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचाही त्यांचा अभ्यास होता आणि त्यानंतर त्यांनी आपल्या धर्मातील तत्त्वज्ञान सांगितले. आणि तेच या शेवटच्या कडव्यात सांगितले आहे.
व्यासराजस्वामी म्हणतात,
व्यासराजस्वामी म्हणतात,
इळीयोळु दुर्मतवा
अळीदु व्यासरपाद
नरलक्येरगी बदरेयल्ली
मोदित इरुववगे || ४ ||
अळीदु व्यासरपाद
नरलक्येरगी बदरेयल्ली
मोदित इरुववगे || ४ ||
म्हणजे येथील दुर्मतांचा, ज्याने कल्याण होणार नाही अशा मतांचे वेदव्यासांच्या सांगण्यावरून खंडन करून अनुभवलेले सत्य आपल्या ग्रंथामधून मांडले आणि ते वेदव्यासांच्या चरणी अर्पण केले आणि बद्री येथे अदृश्य झाले.
इथे व्यासरपाद म्हणताना व्यासराजस्वामींनी त्यांची नाममुद्रा सुरेखरित्या घेतली आहे. असे श्रीमन्मध्वाचार्यही आमचे मंगल करोत असे शेवटी म्हणत हे मंगलम समाप्त होते.
इथे व्यासरपाद म्हणताना व्यासराजस्वामींनी त्यांची नाममुद्रा सुरेखरित्या घेतली आहे. असे श्रीमन्मध्वाचार्यही आमचे मंगल करोत असे शेवटी म्हणत हे मंगलम समाप्त होते.
आज गणेशोत्सवाची सांगता. या उत्सवात त्याने जी काही सेवा आपल्यालाकडून करून घेतली ती त्याच्या चरणी अर्पण आणि सद्गुरूंवरील हे मंगलम आपण पाहिले त्यामागील भाव हा आपापल्या इष्ट देवता आणि गुरूंबद्दल जागृत व्हावा आणि आपले कल्याण साधले जावे इतकीच गजानना चरणी प्रार्थना.
गणेशोत्सवानंतर, नवरात्रात पुरंदरदासांच्या "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा" या अभंगावरील निरूपण आपण पाहणार आहोत.
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७