Sunday, April 24, 2016

सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १ ॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥ २ ॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥
निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४ ॥
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५ ॥
 
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥ध्रु॥
विठो माउलिये हाची वर देई ।
संचरोनी राही हृदयामाजी ॥२॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥ध्रु॥
तुका म्हणे काही न मागे आणिक ।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥३॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥ध्रु॥
 
।। श्रीपांडुरंगाष्टकम् ।।
महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीद्रैः । समागत्य तिष्टंतमानंदकदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ १ ॥
भीमानदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रांत पुंडरीकाला वर देण्या करीता श्रेष्ठ मुनींनसह येऊन तिष्टत असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् । वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ २ ॥
ज्याची वस्त्रे विद्दुलतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत, ज्याची अंगकांती नील मेघाप्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ व भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभा आहे अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ३ ॥
मला अनन्यभावाने शरण येणार्‍या भक्तांना भवसागर हा फक्त कमरेइतकाच खोल आहे, तो सहज पार करता येतो, हे सांगण्याकरता त्याने कमरेवर हात ठेवले आहेत. ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक दूर नाही हे दाखवण्यासाठी त्याने आपली बोटे नाभिस्थानाकडे वळवली आहेत अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् । शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ४ ॥
आपल्या गळ्यांत कौस्तुभमणी घातल्याने जो अतिशय शोभून दिसत आहे, ज्याच्या बाहूंवर केयूर म्हणजे बाजूबंद शोभत आहेत, ज्याच्या जवळ श्री म्हणजे लक्ष्मीचा निवास आहे, जो लोकांचा पालनकर्ता आहे, अशा त्या परमशांत मंगलमय सर्वश्रेष्ठ व स्तुति करण्यास योग्य असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
शरच्चंद्रबिबाननं चारुहासं लसत्कुंडलक्रान्तगंडस्थलांगम् । जपारागबिंबाधरं कंजनेत्रम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ५ ॥
शरदऋतूंतील चंद्रबिम्बाप्रमाणे अत्यंत रमणीय मुख असलेल्या, मुखावर सुंदर हास्य विलसत असलेल्या, कानांत कुंडले घातल्याने त्यांची शोभा गालावर झळकत असलेल्या, ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्ण असलेल्या व कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
किरीटोज्ज्वलत्सर्वदिक् प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरमर्घ्यैः ।
त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ६ ॥
ज्याच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाच्या प्रभेने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, दिव्य आणि अमूल्य रत्ने अर्पण करुन देव ज्याची पूजा करतात, बाळकृष्णरुपाने जो तीन ठिकाणी वाकून उभा आहे, ज्याच्या गळ्यात वनमाला व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभत आहे त्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेषं दधानम् । गवां वृंदकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ७ ॥
सर्व विश्र्व व्यापून राहणार्‍या, वेणु वाजवीत वृन्दावनात फिरणार्‍या, ज्याचा कोणाला अतं लागत नाही, लीलेने गोपवेष धारण केलेल्या, गायींच्या कळपाला आनंद देणार्‍या मधुर हास्य करणार्‍या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो....
अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् । प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ८ ॥
ज्याला जन्म नाही, जप रुक्मीणीचा प्राणाधार आहे, भक्तांसाठी परम विश्राम-धाम व शुद्ध कैवल्य असलेल्या, जागृति, स्वप्न व सुषुप्ति किंवा बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या तीनही अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, नेहमी प्रसन्न, शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।
भवांबोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले हरेरालयं शाश्र्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥
अत्यंत पुण्यदायक असलेले, पांडुरंगाचे हे स्तोत्र जे कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक नित्य पठण करतील ते सर्वजण अन्तकाळी भवसागर सहजपणे तरुन जातील आणि त्यांना परब्रह्म-स्वरुप श्रीहरीच्या-पांडुरंगाच्या शाश्र्वत स्वरुपाची प्राप्ती होईल...
॥ इति श्री परम पूज्य शंकराचार्यविरचितं श्रीपांडुरंगाष्टकं संपूर्णम ॥

 
समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥१॥
आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥
निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥२॥
तुका म्हणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥
 
आतां नको चुकों आपुल्या उचिता । उदारा या कांता रखुमाइऩच्या ॥1॥
आचरावे दोष हें आह्मां विहित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥
आह्मी तों आपुलें केलेसें जतन । घडो तुह्मांकून घडेल ते ॥2॥
तुका ह्मणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥3॥
 
रूप सावळे सुंदर
गळा शोभे तुलसी हार || धृ ||
तो हा पंढरीचा राणा
नकळे योगियांच्या ध्याना || १ ||
पिवळा पितांबर वैजयंती
माया मुकुट शोभे किती || २ ||
एकाजनार्दनी ध्यान
विठे पाऊले समान || ३ ||
नाहीं काम माझें काज तुम्हांसवें ।
होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका ।
न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥
न धरावा लोभ कांहीं मजविशीं ।
जालें देवपिशी तुका म्हणे ॥३अगलि ना इरलारे | निन्नगलि ना इरलारे |
बगे बगे रुपव तोरिद गुरुवे | निन्नगलि ना इरलारे ||धृ||
इम्मन गोदिय | सुम्मने बीसेनु | उम्मायदिंद महागुरुवे ||१||
बीसुव कल्लिगे | लेसवु बरलेंदु | आशिट्ट हर्षदि हाडेने गुरुवे ||२||
सत्तु सत्तु हुट्टि | मत्ते भवदोळु बंदे | गोत्तिगे हाच्चिदि गुरुराया ||३||
कडलोळु तेलुत्त | मडदोळु मुळुगिद्दे | हिडेदेन्नकय्य बिडलिल्ल गुरुवे ||४||
वम्मन हळ्ळियोळ् | नेमदि इरुतले | प्रेमदि भक्तर सलहिदि गुरुवे ||५||

श्री करबसप्पा रामप्पा आवटी हे भाऊसाहेब महाराजांचे चडचण येथील रत्न(शिष्य). महाराजवर वचन या निबरंगी(गुरुलिंगजंगम) महाराजांच्या वचनांची कन्नड लिपीत लिहलेली भाऊसाहेब महाराज हस्तलिखित पोथी ह्यांच्याकडे होती, त्यांनी ती श्री गुरुदेव रानडे ह्यांना दिली. हि पोथी भाऊसाहेब महाराजांनी १९०१ साली बसप्पांस नाम घेतल्यानंतर १ वर्षांनी दिली होती. स्पष्टवक्ते, कुणाचीही भिड न बाळगणारे बसप्पां भारुडे साभिनय रंगवून म्हणत.'नयनेंद्रिय विषयदिंद' हे अखंडेश्वरांचे वचन त्यांस फार आवडे व हातवारे करत अप्रतिम साभिनयाने फारच परिणामकारक रीतीने ते हे वचन म्हणत.'नोड सखी बेळगुतद परमप्रकाशद ज्योती' हे त्यांचे आणखी एक आवडते पद होते. धोतराचा सोगा पदराप्रमाणे डोक्यावर घेत बायकामंडळी दळायला बसतात तसा एक पाय पसरुन जमिनीवर बसत व खुंटा धरुन जात्यावर दळत असल्याच्या भावमुद्रेत ते 'अगलि ना इरलारे' हे जात्यावरचे पद ते अप्रतिमरित्या रंगवत.

 
Perfection is only gradual says Mirabai. A gardener might sprinkle water upon the trees and the plants, but it is only after the spring sets in that the trees and plants bear fruit.

(Chapter V, Page 65, The Bhagavadgita as a Philosophy of God-realisation, being a clue through the labyrinth of Modern Interpretations, R D Ranade)


Granted that all the preparation is made for the realisation if God, that one meets the Guru, that the Guru imparts to him the knowledge of the true path; granted that the seed that is sown is the best of its kind, yet it is only in course of time that a rich harvest can be reaped.

(Chapter V, Page 65, The Bhagavadgita as a Philosophy of God-realisation, being a clue through the labyrinth of Modern Interpretations, R D Ranade)
Wherever there is excellence, wherever there is pre-eminence, wherever there is a portion of the great power and lustre of God, there we might regard that God is present as an incarnation.

(Chapter XI, Page 128, The Bhagavadgita as a Philosophy of God-realisation, being a clue through the labyrinth of Modern Interpretations, R D Ranade)
According to Mahatma Gandhi:- He is a real devotee who is jealous of none, who is a fount of mercy, who is without egoism, who treats alike cold and heat, happiness and misery, who is ever forgiving, who is always contented, whose resolutions are firm, who has dedicated mind and soul to God, who cause no dread, who is not afraid of others, who is free from exultation, sorrow and fear, who is pure, who is versed in action and yet remains unaffected by it, who renounces all fruit, good or bad, who treats friend and foe alike, who is untouched by respect or disrespect, who is not puffed up by praise, who does not go under when people speak ill of him, who loves silence and solitude, who has a disciplined reason." Anasakti Yoga, p 126.

(Chapter XI, Page 129, The Bhagavadgita as a Philosophy of God-realisation, being a clue through the labyrinth of Modern Interpretations, R D Ranade)

Week 118

 Jnanesvara....we should worship God with the blossomed flowers of our actions.

(Chapter XIV, Page 153, The Bhagavadgita as a Philosophy of God-realisation, being a clue through the labyrinth of Modern Interpretations, R D Ranade)
आजि संसार सुफ़ळ झाला गे माये ।
देखियेले पाय विठोबाचे ॥१॥
तो मज व्हावा तो मज व्हावा ।
वेळोवेळां व्हावा पांडुरंग ॥२॥
बापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा ।
निवृत्तीने तत्त्वतां सांगितलें ॥३॥


सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण ।
पतीतपावन हरि एक ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिका वोळलें ।
आणूनि ठेविलें भीमातीरीं ॥ २ ॥
नलगती त्या सिद्धि करणें उपाधी ।
नित्य चित्तशुद्धि विठ्ठलनामें ॥ ३ ॥
कळिकालासि त्रास चित्तीं ह्रषिकेश ।
उगवला दिवस सोनियाचा ॥ ४ ॥
त्रिभुवनीं थोर क्षेत्र पैं सार ।
विठ्ठल उच्चार भीमातीरीं ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर निवाला सत्वर ।
नित्यता आचार विष्णुमय ॥ ६ ॥

 

Saturday, April 23, 2016

रूप सावळे सुंदर
गळा शोभे तुलसी हार || धृ ||
तो हा पंढरीचा राणा
नकळे योगियांच्या ध्याना || १ ||
पिवळा पितांबर वैजयंती
माया मुकुट शोभे किती || २ ||
एकाजनार्दनी ध्यान
विठे पाऊले समान || ३ ||
 
रूप सावळे सुंदर
गळा शोभे तुलसी हार || धृ ||
तो हा पंढरीचा राणा
नकळे योगियांच्या ध्याना || १ ||
पिवळा पितांबर वैजयंती
माया मुकुट शोभे किती || २ ||
एकाजनार्दनी ध्यान
विठे पाऊले समान || ३ ||


देव दर्शन added a new photo.
2 hrs ·
वैष्णो देवी पुराणी गुफा दर्शन , इस दर्शन को नकारे नहीं शेयर करे !!
April 24, 1184BC - The Greeks enter Troy using the Trojan horse (traditional date)

LikeShow more reactions
Comment
Maa Vaishno Devi ki "Parsadi"
Ek-Ek kar Sare Bhakht lelo.......
Jai Mata Di
Shakshuka is a popular breakfast in North Africa and the Middle East. If you don’t have time for a breakfast that takes 30 minutes, try this flavorful and savory dish for dinner. No zucchini? Use bell peppers or eggplant. This recipe is adapted from Melissa Clark’s version in The New York Times.
Ingredients
2 Tbsp extra-virgin olive oil
1 large yellow onion, halved and thinly sliced
1 medium zucchini, halved and thinly sliced...
See More

LikeShow more reactions
Comment
२४ एप्रिल: संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे.
मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला ? परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात; तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे, आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत प...
See More

मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला ? परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात; तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांग…
satsangdhara.net
आतां नको चुकों आपुल्या उचिता । उदारा या कांता रखुमाइऩच्या ॥1॥
आचरावे दोष हें आह्मां विहित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥
आह्मी तों आपुलें केलेसें जतन । घडो तुह्मांकून घडेल ते ॥2॥
तुका ह्मणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥3॥
ganesh

Friday, April 22, 2016

विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ।।
आदिनाथापासून । परंपरा आली जाण ।।
ज्ञानदेवा ज्ञान दिले । चांगदेवातें बोधिलें ।।
तोचि बोध माझे मनीं । राहो एका जनार्दनी ।।

मेळवोनी मेळा गोपाळांचा हरी ।
निघे करावया चोरी गोरसाची ।।
धाकुले सवंगडे घेऊनी आपण ।
चालती रामकृष्ण चोरावया ।।
ठेवियले लोणी काढती बाहेरी ।
खाती निरंतरी सवंगडी ।।
एका जनार्दनी तयाचे कौतुक ।
न पडे ठाऊके ब्रह्मादिका ।।
The doctrine of Brahman could be regarded neither as Brahmanic nor as Kshatriyan, and that anybody, who came to 'know', to whatever class he might have belonged, was regarded as Sage.

(Page 333, Bibliographical note, A Constructive Survey Of Upanishadic Philosophy R D Ranade)


One of the central teachings of Christianity, namely...the doctrine of humility: "Except ye become as little children, ye shall not enter into the kingdom of heaven" (St. Matthew XVIII.3)

(Page 20, Philosophical and Other Essays, R D Ranade)


I believe that Bhakti does not consist in religious ceremonials, in pilgrimages, and in formal idol-worships: it consists in love to God, and through this, in love to man. We can never love man so well as when we know that he partakes of the same divine nature which is in us. Love to humanity must be based on Love to God: if it is not, it is bound to have a shaky foundation. It is the Love which we bear to God that inspires us with Love to man: and those who love man otherwise love him accidentally and not essentially.

(Page 181, Philosophical and Other Essays, R D Ranade)
 

 A frank acknowledgement of one's error is the noblest duty that one can do.

(Page 84, An Ideal Critic - Essays and Reflections, R D Ranade)
 

 
...the spirit which breathes in the twelfth Edict of Asoka is a permanent monument to its greatness: "There should be no praising of one's sect and decrying of other sects, but on the contrary, a rendering of honour to other sects for whatever cause honour may be due to them." If this spirit pervades our everyday activities, if it becomes the foundation-stone of our philosophies and religions, if our politics come to be based upon such a principle, the world will soon be habitable, for God will come to live in it.

(Page 98, Essays and Reflections - Indian Philosophy, R D Ranade)


We are born here below in this mortal world in order to do action. But we should also see that we do not become entangled in it.

(Chapter 1, Page 13, The Bhagavadgita as a Philosophy of God-realisation, being a clue through the labyrinth of Modern Interpretations, R D Ranade)

  
हनुमंत महाबळी। रावणाची दाढी जाळी॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर॥२॥
करोनि उड्डाण। केलें लंकेचे शोधन ॥३॥
जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका॥४॥
तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।
सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥
अनुमाने ना अनुमाने ना ।
श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥
तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।
स्थूळ-सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥
तुज आकारू म्हणों कीं निराकारू रे ।
आकारू-निराकारू एकु गोविंदु रे ॥४॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे ।
दृश्याअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥
तुज व्यक्‍त म्हणों कीं अव्यक्‍तु रे ।
व्यक्‍त-अव्यक्‍त एकु गोविंदु रे ॥६॥
निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥
रामकृष्णहरी जय जय रामकृष्ण हरी

 

Thursday, April 21, 2016

शरण शरण हनुमंता । तुम्हा आलो रामदूता ।।
काय भक्तिच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ।।
शुर आणिक धीर । स्वामी काजी तू सादर ।।
तुका म्हणे रुद्रा । अंजनिचिया कुमरा ।।

 

Wednesday, April 20, 2016

विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरिलि ॥१॥
विठ्ठलविठ्ठल भावें म्हणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥
बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥२॥
तुका म्हणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥३॥
 

Tuesday, April 19, 2016

संसारसिंधु हा दुस्तर । नुल्लंघवे उल्लंघितां पार ।
बहुत वाहाविले दूर । न लगेचि तीर पैल थडी ॥१॥
किती जन्म झाला फेरा । गणित नाहीं जी दातारा ।
पडिलों आवर्ती भोंवरा । बहु थोरा वोळसिया ॥धृ॥
वाढलों परि नेणती बुद्धि । नाहीं परतली धरिली शुद्धि ।
मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधि सांडूनियां ॥३॥
अनेक खाणी आहार निद्रा । भयमैथुनाचाचि थारा ।
बालत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥४॥
ऐसी उल्लंघूनि आलों स्थळें । बहु या भोवंडिलों काळें ।
आतां हें उगवावें जाळें । उजेडावें बळें दिवसाच्या ॥५॥
सांडो या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट ।
दावी सत्या ऐसें नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट झालों देवद्रोही ॥६॥
भावार्थ -
ज्यांच्या अंतःकरणातील ज्ञान अज्ञानाने आवृत्त झालेले आहे, अशा सार्‍या जीवांसाठी (मनुष्यप्राण्यांसाठी) स्वोद्धाराचा मार्ग तुकोबाराय स्वानुभवातून या अभंगाद्वारे उपदेशित आहेत. स्वोद्धार म्हणजेच स्वस्वरूपाचे ज्ञान होणे आणि त्यासाठी आवश्यक असणार्‍या अंतर्बाह्य जागृतीची निकड ते प्रतिपादितात.
संसारसिंधु किंवा भवसागर हा दुस्तर म्हणजेच तरून जाण्यास अवघड असा आहे. या सागराचे परिमाण शब्दातीत आहे. या उलट जीव अल्पशा आंतरिक शक्तीने युक्त असल्यामुळे हा सागर तरून पैलतीर गाठण्याचा जीवाने कितीही प्रयत्न केला तरी त्याला तरून पैलतीर गाठणे शक्य होत नाही आणि त्याला हा सागर उल्लंघूनही जाणे सहज शक्य होत नाही. श्रीज्ञानेश्वरमाऊली सांगतात, ‘तैसे आस्थेचां महापुरीं । रिघताती कोटिवरी । परी प्राप्तीचां पैलतीरीं । विपाइला निगे ॥’ (अंतःकरणातील आस्थेच्या महापुरात कोट्यवधी साधक स्वतःला झोकून देतात, परंतु एखादाच पैलतीराला पोहोचतो आणि माझे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो.) तुकोबारायांनीही अनुभवले आहे की, या संसारसिंधूत संभ्रमित होऊन खर्‍या ज्ञानापासून दूर वाहवले जाणेच नशिबी येते, पैलतीराला लागताच येत नाही.
अशा या संभ्रमित अवस्थेत अगणित वेळा जन्म-मरणाचे फेरे घेऊनदेखील जीव त्यातून सुटण्याचा विचारही मनात आणित नाही. अज्ञानाने आवृत्त राहिल्यामुळे जन्म-मरणाचे अनेक वळसे घेत या भोवर्‍यात सापडलेल्या जीवासाठी आवर्त अनुल्लंघनीय असल्याचे दिसून येते. तुकोबारायांचे हे निवेदन करतात की, ‘दातारा’ला संबोधून केलेले आहे. ‘दातार’ हे ब्रीद जसे भगवंताचे आहे, तसेच ते संतांचेही आहे. किंबहुना संत हे सहृदय असल्याने त्यांच्यापुढे अंतःकरणातील वेदना व्यक्त करणे, आर्ताला अवघड वाटत नाही. तथापि, संतांशी भेट घालून देण्याचे कार्य भगवंतच करीत असतो. त्यासाठी प्रथम भगवंताला करुणेचा पाझर फुटणे आवश्यक असते. त्याला तशी करुणा यावी, यासाठी भगवंतापुढे स्वाभाविकरित्या आपले आर्त प्रथम प्रगट केले जात असते.
तुकोबाराय पुढे परिहार देतात की, जन्माला आलेला देह नैसर्गिक रित्या वाढत राहिला खरा, पण बुद्धीचे स्वातंत्र्य असूनही ती मात्र खरे काय, खोटे काय याचा निर्णय घेण्यास समर्थ झाली नाही. तुकोबाराय ‘वाढलों’ असे म्हणतात. येथे जीवाचे उत्क्रांत होत जाणे दाखविले आहे. अनंत जीव-खाणींमध्ये अत्यंत कनिष्ठ जीवजंतूच्या योनीपासून ते परमोच्च मानवदेहापर्यंत प्राप्ती झाली खरी, तरी बुद्धीच्या ठायी विवेक-जागृती मात्र झाली नाही. उपरती झालेले तुकोबाराय म्हणून किंचित् प्रश्न पुढे मांडतात की, मानवदेह प्राप्त झाला ही फार मोठी संधी लाभली आहे. आताच मी सारासार विचार करायचा नाही, तर तो करायचा कधी?
संसारसिंधूतील आवर्तात सापडलेल्या जीवाला अमूल्य मानवदेह प्राप्त झाला असला तरी जीवनाचे सार्थक साधण्यासाठी सारासार विचार करण्याची बुद्धी व्हावयास हवी. मनुष्ययोनी प्राप्त होऊनही अनेक खाणीतील मूढ प्राण्यांप्रमाणे जीव आहार-निद्रा-भय-मैथुन यातच गुरफटलेला राहतो. शिवाय देहाला निसर्गतःच बाल्य-तारुण्य-जरा (म्हातारपण) या अवस्थांतून जावे लागत असते. या सार्‍या अवस्था केवळ भोगप्रधान असल्याचे दिसते, असे तुकोबाराय निक्षून सांगतात. जीवजंतूपासून पशुपक्षादी अनेक योनींमधून भ्रमण करीत असताना त्या ठिकाणी भोगवृत्तीमुळे आहार-निद्रा-भय-मैथुन यांचाच संग झालेला होता आणि आता मनुष्ययोनी प्राप्त होऊनही त्या अवस्थात्रयांमधे संपूर्णतः चित्तामध्ये भोगांचाच विचार केंद्रस्थानी राहिला. या दशेतून बाहेर पडण्याचा विचारदेखील मनात आला नाही. प्रत्येक योनीतील भोग भोगूनही भोगाचा वीट आला नाही आणि योग-बुद्धी प्राप्त झाली नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, प्रपंचाला विन्मुख आणि परमार्थाला सन्मुख होण्याची बुद्धी मिळावी. ते भगवंताला शरण्य समजून त्याच्या पायाशी तशी विनवणी करतात. त्यांची अशी भावना आहे की, मानवजन्माची अशी सुवर्णसंधी दवडून घालवणे, हे अविवेकाचे द्योतक ठरणारे आहे.
तुकोबाराय अत्यंत कळकळीने निवेदन करतात की, अशा अनेक योनी आणि अनेक जन्म भोगून आता अलौकिक असा मानवदेह प्राप्त झाला आहे. मानवयोनी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही योनीत भोगाशिवाय इतर गोष्टींमधला विवेक जागृत असण्याचा प्रश्नच नव्हता. भोगप्रधान अवस्थेत अनंत काळ निघून गेला. तुकोबारायांना आता या दुरिताच्या जाळ्यातून सोडवणूक हवी आहे. ते म्हणतात, ‘मी अज्ञानरूपी रात्रीच्या अंधारात कालक्रमणा करीत होतो. हे दातारा, आपल्या सामर्थ्याने विवेकयुक्त ज्ञानाचा प्रकाश (दिवस) मला प्राप्त करून द्यावा. तुकोबाराय ‘उजेडावें बळें दिवसाच्या’ असे म्हणतात. दिवसाचे बळ कला-कलाने वाढत जाऊन माध्यान्ही पूर्णावस्थेला पोहोचलेले असते. त्यावेळचा प्रकाश सर्वात जास्त लखलखीत असतो. भगवंताच्या प्राप्तीविषयीचे ज्ञान हे इतर सर्व प्रकारच्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते, असा येथे लक्षार्थ दिसून येतो.
अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय मनापासून ‘दाताराला’ विनवितात की, या संसाराची वाट म्हणजेच जन्म-मरणाचे करावे लागणारे फेरे त्यांच्या कृपेशिवाय संपणारे नाहीत. हे फेरे संपावेत (सांडो), इतकी कृपा करावी.’ ‘दातारा’च्या मनात करुणा जागी व्हावी व त्याने एव्हढे कृपादान द्यावे यासाठी तुकोबाराय कळवळून निवेदन करतात की, हा संसार अतिशय कष्ट भोगविणारा आहे. हा संसार असा काही आभास दाखवितो की, जे केवळ हानीकारक, भ्रामक आहे, त्यालाच जीव सत्य मानू लागतो आणि वृथा अहंपणाच्या तोर्‍यात राहून भगवंताशी द्रोह करतो. स्वतःला भगवंतापासून वंचित करून घेतो.
पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥ १ ॥
वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥ २ ॥
पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥ ३ ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥ ४ ॥
 
देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा
विठु राहे पंढरपूरी, वैकुंठच हे भूवरी
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा
साजिरे रूप सुंदर, कटि झळके पीतांबर
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा
 
श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीची षोडशोपचार पूजा करुन निळोबांनी स्वरचित आरती म्हटली. नंतर तिथे त्यांचे किर्तन झाले.ते संपताच देवस्थानातर्फे माउलीचा प्रसाद म्हणुन निळोबारायास भरजरी शालजोडी पांघरण्यात आली. बिदागी म्हणुन श्रीफल व ३ सुवर्णहोन देण्यात आले. त्यांनी ते होन परत केले व म्हणाले:
कोणतीही न धरुनी आशा| भजावे जगदिशा किर्तनाते||
मग तो कृपेचा सागर| उतरील पार भवसिंधु||
तोडोनिया ममता जाळ| करील कृपाळ वरी कृपा||
निळा म्हणे आवडी त्यासी| कीर्तनापाशी तिष्ठतसे||
देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥१॥
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥
देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥२॥
तुका म्हणे हरी । प्रर्हा दासि यत्न करी ॥३॥
 
तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥१॥
सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥
उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥२॥
तुका म्हणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥
तुका म्हणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥३॥

 

Monday, April 18, 2016

सगुण स्वरुप तुमचे हरी|शोभते हे विटेवरी||
तेणे लागली टकमक| डोळां आवडे आणिक||
मना बुद्धिसीही भुली|इंद्रिये गुंफोन राहिली||
निळा म्हणे तनुप्राण| गेली आपणा विसरोन||
अहं नैव मन्ता न गन्ता न वक्ता न कर्ता न भोक्ता न मुक्ताश्रमस्थः ।
यथाहं मनोवृत्तिभेदस्वरूप- स्तथा सर्ववृत्तिप्रदीपः शिवोऽहम् ॥ ४॥

माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥1॥
विसरतां रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥
विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥2॥
तुका ह्मणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥3॥
अबीर गुलाल उधळीत रंग ।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
उंबरठ्यासी कैसे शिवू ? आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहूं ? त्यात आम्ही दीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥

वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।...

अबीर गुलाल उधळीत रंग ।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
उंबरठ्यासी कैसे शिवू ? आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहूं ? त्यात आम्ही दीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥

वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।...
रामकृष्ण हरि.!!
कामदा एकादशीच्या शुभेच्छा.!!
आनंदे नाचत पंढरीसी जाऊ |
गीती गुण गाऊ विठोबाचे ||
पंढरी पावन पुण्यभूमी जाणें |
विठ्ठल दर्शनें दोष जाती ||
आनंदे हो प्रेमे नाचू महाद्वारी |
आठवू अंतरी घडोघडी ||
आम्हां वैष्णवाचा कुळधर्म कुळीचा |
घोष हरिनामाचा सदा वाचें ||
विठा नामयाचा चरणी झाला लीन |
सापडले धन विटेवरी ||
मानामान किती ।
तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥1॥
जा रे चाळवीं बापुडीं ।
कोण्ही धरितील ते गोडी ॥2॥
रिद्धीसिद्धी देसी।
आम्ही चुंभळें नव्हों तैसीं ॥3॥
तुका म्हणे ठका ।
ऐसें नागविलें लोकां ॥4॥
धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥
तें हें ब्रह्म विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
अंतर व्यापी बाहे । धांडोिळतां कोठें नोहे ॥2॥
योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥3॥
दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥4॥
अवघी लीळा पाहे । तुका ह्मणे दासां साहे ॥5॥

Sunday, April 17, 2016

कामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.!!
आनंदे नाचत पंढरीसी जाऊ | गीती गुण गाऊ विठोबाचे ||
पंढरी पावन पुण्यभूमी जाणें | विठ्ठल दर्शनें दोष जाती ||
आनंदे हो प्रेमे नाचू महाद्वारी | आठवू अंतरी घडोघडी ||
आम्हां वैष्णवाचा कुळधर्म कुळीचा | घोष हरिनामाचा सदा वाचें ||
विठा नामयाचा चरणी झाला लीन | सापडले धन विटेवरी ||
 

Saturday, April 16, 2016

कापुराचे थलीव ।
नुरेचि आगीची बरव ।
नुरेचि रूप नाव ।
तैसे यया ।।
🍀श्रीज्ञानदेव म्हणतात की कापुरापासून सुंदर अलंकार केले की त्या कोरीव अलंकारांच आपण कौतुक निश्चितपणे करतो .ते अलंकार अग्नीच्या सहवासात आले नाहीत तोपर्यंत कापुराच्या अलंकाराचं वैभव नेत्र अनुभवत राहतील. ते अलंकार वाणीचा विषय ठरतील .पण एक लक्षात घ्या की त्या कोरीव अलंकारांना एकदा का ज्वालेने आलिंगन दिले की ज्वाला क्षणभर देखणी दिसेल आणि ते कोरीव अलंकार अग्नीमध्ये विरघलून जातील .त्या कापुराच्या अलंकारांची लहानशी भस्मखूण सुध्दा मागे शिल्लक रहाणार नाही. तसेच शिष्य जेव्हा सद्गुरूंच्या सहवासात येतो, सद्गुरू आपल्या परमशिष्याला जेव्हा गाढ आलिंगन देतो तेव्हा तो परमशिष्य सद्गुरुमय होऊन जातो .शिष्याच्या नामाची नावनिशाणीसुध्दा मागे रहात नाही .सद्गुरू त्याला नामविरहित करून टाकतो . श्रीज्ञानदेव म्हणतात की शिष्य हा नामस्मरणात दंगझाला आहे , नामस्मरणात तेजालून उठतो आहे हे सौंदर्य वैभव आजूबाजूच्या लोकांना तोपर्यंतच आश्चर्याचा विषय होईल जोपर्यंत शिष्य सद्गुरूत विलिन झाला नाही ..... म्हणजे देखणा कापूर आणि नामरूपात चमकणारा शिष्य ह्यांचे अस्तित्व भुलवते हे खरे आहे .परंतु अस्तित्वरहित होणे हा दोघांचाही मूलत: गुणधर्मच आहे .
देहभाव आह्मी राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥1॥
आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥
ह्मणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥2॥
जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥3॥
तुका ह्मणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥4॥
देहभाव आह्मी राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥1॥
आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥
ह्मणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥2॥
जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥3॥
तुका ह्मणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥4॥