Thursday, July 23, 2015


॥ श्रीहरिः ॥

लागोनियां पायां विनवितोँ तुम्हांला ।
करेँ टाळी बोला मुखें नाम ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां ।
हा सुखसोहळा स्वर्गीं नाहीँ ॥
सकळांसीं येथें आहे अधिकार ।
कलियुगीँ उद्धार हरिनामेँ ॥
तुका म्हणे नामापाशीँ चा-ही मुक्ति ।
ऐसें बहु ग्रंथी बोलियेलेँ ॥

No comments: