***दास परंपरा, पंढरपूर आणि विठ्ठल***
आषाढी कार्तिकीला आपल्या महाराष्ट्रात होत असलेली पंढरपूरची वारी परिचित नाही असा एकही मनुष्य महाराष्ट्रात नसेल. आजचा समाज एकत्र येऊन भगवंताचे सण उत्सव साजरे करतो याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या येथील संत परंपरेने केलेले कार्य आहे. महाराष्ट्रातील संत म्हणजे फक्त मराठीच का? यावर थोडा प्रकाश टाकणे गरजेचे वाटते. ज्या ज्या संत सत्पुरूषांनी या भूमीत आपलं कार्य केले, आणि या भूमीतील लोकांना भगवद्भक्तीच्या मार्गाला लावले त्या त्या सर्व संत सत्पुरूषांचे स्मरण आपण केले पाहिजे आणि त्या सर्व संतांचा समावेश या भूमीतील संतांमध्ये केला पाहिजे. मग ते कोणत्याही सांप्रदाय अथवा मतप्रवाहाचे असोत.
ज्या काळात महाराष्ट्रात वारकरी सांप्रदाय सुरू झाली साधारणतः त्याच कालखंडात कर्नाटकात दास परंपरा सुरू झाली. मध्वाचार्यांनी शंकाराचार्यांच्या मताचे खंडन करणे एवढे सोडल्यास अन्य काय योगदान दिले? असा प्रश्न बहुतांश मंडळींना पडतो. आचार्यांच्या योगदानावर एक लेखनमाला नव्हे तर पुस्तकसुद्धा लिहीता येईल पण त्या योगदानांपैकी एक योगदान म्हणजे संगीत, काव्य, नृत्य यांमधून भगवद्भक्तीचा प्रसार करणे. मूळ दास परंपरेचा उगम हा आचार्यांपासूनच होतो.
कर्नाटकु विठ्ठल आपल्या महाराष्ट्रात आला पण दास परंपरेतील सर्व दासांच्या रचनांमधून पुन्हा तो कर्नाटकात मूर्त झाला. संगीत,भक्ती,नामस्मरण आणि विठ्ठल एवढच महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या भूमीने जवळपास ४००-५०० वर्ष बरोबरीने अनुभवलं.
त्याकाळी पंढरपूर हे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचे संगम स्थान होते. कर्नाटकातूनही पंढरपूरात वारी यायची. हे अनेक दासांचे काही अभंग पाहिल्यास लक्षात येते. आज मात्र दुर्दैवाने पुरंदर खांब सोडल्यास दास परंपरेचा उल्लेख महाराष्ट्रात होत नाही.

दास परंपरेत बहुतांश रचना, पदे ही अर्थात कानडीत
आहेत. पण काही दासांच्या रचनेत मराठी आढळून येते. मराठीत अभंग रचाना असतीलंही पण काळाच्या ओघात त्यांच्या मूळप्रती नष्ट झाल्या आहेत. महिपती दास पुरंदरदास आणि यति वर्गात जयतीर्थ, सत्यतीर्थ, विद्याधीशतीर्थ हे महाराष्ट्रातलेच आणि येथेच बराच काळ वास्तव्य केलेले होते. त्यानंतरा सांप्रदायातील सर्व यति संचारार्थ पंढरपुरात येत होते. वादिराजस्वामी या विठ्ठलाचे वर्णन करतात, हा विठ्ठल म्हणजे कृष्ण परमात्माच आहे. बालकृष्ण आहे, गोपालक आहे. "गोपाल बालः कृपया स्वयन्नः श्री पांडुरंगो भवतु प्रसन्नः"

कदाचित मतप्रवाह आणि सांप्रदायकडे अधिक लक्ष दिल्यामुळे त्यांच्या या भूमीतील भगवद्भक्ती प्रसाराच्या कार्याकडे आपण दुर्लक्ष केले असावे. पण सर्वच संत सत्पुरूषांनी आपल्याला आपलेसे केले आहे आणि ते करतातंच यात शंका नाही. आपण विशाल दृष्टीने आणि मत सांप्रदायाची बंधने तोडून सर्व सत्पुरूषांच्या चरणी लीन व्हायला हवे. महिपती दासांच्या एका रचनेत त्यांनी कानडी,उर्दू, पर्शियन आणि मराठी याचे मिश्रण केले आहे ते म्हणतात,
तिळीदु नोडी श्रीगुरूकृपेयिंदा |
हुवा खुदा का बंदा ||
महिपती गायितु बलु आनंदा |
हरि म्हणा गोविंदा ||
श्रीगुरूंच्या कृपेमुळे मला समजलं, मी पाहू शकलो आणि मी झालो, काय? तर, त्या खुदाचा म्हणजे भगवंताचा मी बंदा आहे, शिष्य, चेला आहे म्हणजेच दास आहे. आणि हा महिपती आनंदाने जे म्हणतो तेच तुम्ही म्हणा म्हणजे त्या हरिचे, भगवंताचे नाम.

आजच्या या कार्तिक कृष्ण म्हणजेच उत्पत्ति एकादशीच्या दिवशी आपण सर्वांनी भगवंताकडे हीच प्रार्थना करूयात की, तुझ्याकडे घेऊन येणाऱ्या, तुझी भक्ती रूजवणाऱ्या सर्व सत्पुरूषांचे स्मरण आमच्याकडून घडू दे आणि सर्वांप्रती मत सांप्रदायाची बंधने सोडून आदराची भावना जागृत होऊ दे.
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
No comments:
Post a Comment