Wednesday, October 14, 2020

 ।। श्री सद्गुरु समर्थ ।।

🚩
सूक्ति -सुमने
२६) मायेत, प्रपंचात, अडकलेल्या पुरूषाने सद्गुरुंची कृपा संपादून त्यांनी दिलेल्या नामाचे अखंड स्मरण केले म्हणजे त्याला नामामृत प्राप्त होते. त्याने त्याची दशेंद्रिये समाधान पावतात व सर्व आशा जळून जातात.
संदर्भ - साधक-बोध
श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या पत्रातील शिकवण
लेखक :-
श्री. ग. वि. तुळपुळे
श्री. ना. द. हरिदास


।। श्री सद्गुरु समर्थ ।। 🚩
सूक्ति -सुमने
२५) एकदम कोणी ज्ञानी, साक्षात्कारी होत नाही. परंतु साक्षात्काराचा ध्यास असला म्हणजे, नामस्मरण होऊन हळूहळू साक्षात्कार होतो.
संदर्भ - साधक-बोध
श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या पत्रातील शिकवण
लेखक :-
श्री. ग. वि. तुळपुळे
श्री. ना. द. हरिदास

 प.पु.सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज उमदीकरांनी आपल्या निर्याणाची सूचना काही प्रसंगाने आपल्या भक्तांना साधकांना देऊन ठेवलेली होती. काही प्रसंगातून त्यांनी तसे सूचित केले होते.

या संबंधीचे काही दाखले खालील प्रसंगातून दिसतात.
सामान्य माणसांना हे प्रसंग व असे सूचित बोलणे नंतर समजते हेच खरंय.
(१)
श्रीमहाराजांच्या घराण्याचे उपाध्ये एकदा त्यांच्या घरी आले होते. तेव्हा श्रीमहाराज उघड्या अंगाने बसले होते. तेव्हा ते महाराजाना म्हणाले "भाऊराय चांगला पैलवानासारखा दिसतोस की !"
त्यावर श्रीमहाराज त्यांना म्हणाले होते की होय दिवा शांत होताना मोठा होतो.
(२)
जतला श्रीशिवलिंगवा
अक्कांनी श्रीमहाराजांची नाजूक झालेली प्रकृती पाहून त्यांना चार दोन दिवस घरी राहण्याची विनंती केली. पण श्रीमहाराज त्यांना म्हणाले "शिवाक्का एकदोन दिवसात बरा होणार हा आजार आहे, असे तुला वाटते का ? निंबरगी महाराज एक आठवडा अंथरुणावर पडून होते, श्रीसाधू बुवा दोन आठवडे पडून होते. या देहाला दोन महिने पडून रहावे लागणार आहे."
(३)
श्रीमहाराज अथणीहुन जत ला जाण्यासाठी निघताना त्यांची दाढी करण्या साठी एक न्हावी आला. तो त्यांना म्हणाला "महाराज आपल्या अंगावरील बाराबंदी चांगली दिसते." त्यावर श्रीमहाराजानी त्याला विचारले "तुला हवी का ?" त्याने उत्तर देण्याचा आत "ही घे" म्हणून ती त्या न्हाव्याला देऊन सुद्धा टाकली.