Sunday, March 27, 2016
!! संत संग देई सदा !!
लागोनियां पाया विनवितो तुम्हांला ।
कर टाळीं बोला मुखें नाम ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा ।
हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद ।
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥
सकळांसी येथें आहे अधिकार ।
कलियुगीं उद्धार हरिनामें ॥
तुका म्हणे नामापासीं चारी मुक्ति ।
ऎसें बहु ग्रंथीं बोलियेलें ॥
रामकृष्णहरि माऊली
लागोनियां पाया विनवितो तुम्हांला ।
कर टाळीं बोला मुखें नाम ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा ।
हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद ।
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥
सकळांसी येथें आहे अधिकार ।
कलियुगीं उद्धार हरिनामें ॥
तुका म्हणे नामापासीं चारी मुक्ति ।
ऎसें बहु ग्रंथीं बोलियेलें ॥
रामकृष्णहरि माऊली
Saturday, March 26, 2016
प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणिवेत आहे.
प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की, खोटे करूनसुद्धा जर सुखी होता येते तर तसे करायला काय हरकत आहे ? सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो, अशीही शंका आपल्याला येते. मी देवाला भिऊन वागलो, का, तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग ? किती विचित्र आहे पाहा, खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलावण्यासारखा हा प्रकार आहे ! प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे; ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावे ? भगवंताचा 'साधन' म्हणून आपण उपयोग करतो, आणि शेवटी साधनालाच दोष देतो, साध्य बाजूलाच राहते. भगवंत विषय देईल, पण त्याबरोबर त्याचे दुःखही देईल. एकजण मारूतिरायाला सांगून चोरी करीत असे. तो एकदा पकडला गेला आणि त्याला शिक्षाही झाली; तेव्हा तीही मारूतीच्या संमतीनेच झाली असे नाही का ?
'मी कोण' हे जोवर आपण ओळखत नाही तोवर, वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला, त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार? ठिगळे लावून आपण प्रपंच करतो; मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहात ! कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे आहे. सुखदुःख हे जाणिवेत आहे. आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवेनकोपण, म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहात नाही. वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या श्वानाप्रमाणे आहे, त्याला नुसते हड्हड् करून ते बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच त्याला लाडावून ठेवले आहे, म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ते देवघरात येते. बरे, चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत ! वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे' अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही; ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही; आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.

न पश्यति जन्मांध: कामान्धो नैव पश्यति।
न पश्यति मदोन्मत्तो ह्यर्थी दोषान न पश्यति।।
जन्म से अन्धे को दिखाई न देता, कामांध को भी कुछ नही दिखता,शराब आदि के कारण उन्मत्त को कुछ नहीं सुझता,और स्वार्थी अपने काम को सिद्ध करने की धुन में दोष नहीं देखता।
काम क्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं ।
वास पंढरीचा जन्म सदा देइप । आणीक दुजें मागणें तुज नाहीं ॥1॥
कृपा देइप दान हरि मज कृपा देइप दान । नासीं त्रिमिर दाखवीं चरण ।
आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥ध्रु.॥
नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण ज्यागृतिं स्वप्नीं ।
संतसमागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥2॥
पंथपुरिंचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता ।
नाहीं आडताळा त्रैलाक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणीं ठेवूनि माथा ॥3॥

नेहमी नामस्मरण केले असता सर्व काम आपोआप होते. देव साहय्य करतो.
सत्यसंकल्पाचा दाता भगवान त्यामुळे आरोग्य प्राप्त होऊन आनंदच होतो. रोज
तीन वेळा निष्ठेने नामस्मरण केले असता मनात संशय,विकल्प निर्माण होत नाहीत व
सदगुरु देहाने दूर असले तरी संकट दूर करण्यास शिष्याच्या जवळच असतात, असा
अनुभव येतो. - साधक बोध.
Athavani by P. Lalitakka
11. Shri Gurudev used to often ask Shri Pralhadrao Kulkarni the meanings of Kannada words. Once Shri Gurudev asked Shri Pralhadrao the meaning of 'Nere nambu'.He said 'believe in God properly or thoroughly ' .Shri Gurudev was not satisfied. Gurudev then asked the meaning of 'Nere Hore '.Shri Pralhadrao said neighbourhood or placed /situated at right or left. Then Shri Gurudev said, " Now I got the meaning of Nere nambu. ' further Gurudev said, " It is believing in God only after having Sakshatkar. Being beside God. Then believing in him. "
Till then no one had given the meaning of the phrase so accurately.
ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटी दुःख कैंचें ॥१॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो ॥२॥
पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरि मुखें गाय नित्य नेमें ॥३॥
Let us learn to contain our ego! Let us strive to get strong to bear the consequences of the faults of the world! Let us be judicious to offer support for those who are in grief, so they can relieve of it themselves!
ಲೋಕದ ಡೊಂಕ ನೀವೇಕೆ ತಿದ್ದುವಿರಿ ?
ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ತನುವ ಸಂತೈಸಿಕೊಳ್ಳಿ;
ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮನವ ಸಂತೈಸಿಕೊಳ್ಳಿ.
ನೆರೆಮನೆಯ ದುಃಖಕ್ಕೆ ಅಳುವರ ಮೆಚ್ಚ
ನಮ್ಮ ಕೂಡಲಸಂಗಮದೇವ.

काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥४॥
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥
Let us learn to contain our ego! Let us strive to get strong to bear the consequences of the faults of the world! Let us be judicious to offer support for those who are in grief, so they can relieve of it themselves!
ಲೋಕದ ಡೊಂಕ ನೀವೇಕೆ ತಿದ್ದುವಿರಿ ?
ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ತನುವ ಸಂತೈಸಿಕೊಳ್ಳಿ;
ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮನವ ಸಂತೈಸಿಕೊಳ್ಳಿ.
ನೆರೆಮನೆಯ ದುಃಖಕ್ಕೆ ಅಳುವರ ಮೆಚ್ಚ
ನಮ್ಮ ಕೂಡಲಸಂಗಮದೇವ.
Why do you try to mend the failings of the world?
Strengthen (Assuage) your bodies first, each one of you!
Strengthen (Assuage) your own minds, each one of you!
Lord Kudala Sangama Deva does not approve (sympathize with) those bemoaning (weeping for) neighbor’s grief!

Subscribe to:
Posts (Atom)