!! संत संग देई सदा !!
लागोनियां पाया विनवितो तुम्हांला ।
कर टाळीं बोला मुखें नाम ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा ।
हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद ।
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥
सकळांसी येथें आहे अधिकार ।
कलियुगीं उद्धार हरिनामें ॥
तुका म्हणे नामापासीं चारी मुक्ति ।
ऎसें बहु ग्रंथीं बोलियेलें ॥
रामकृष्णहरि माऊली
लागोनियां पाया विनवितो तुम्हांला ।
कर टाळीं बोला मुखें नाम ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा ।
हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद ।
मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥
सकळांसी येथें आहे अधिकार ।
कलियुगीं उद्धार हरिनामें ॥
तुका म्हणे नामापासीं चारी मुक्ति ।
ऎसें बहु ग्रंथीं बोलियेलें ॥
रामकृष्णहरि माऊली
No comments:
Post a Comment