Sunday, August 9, 2015

भज गोविन्दम ॥१॥

                  *॥भज गोविंदम॥*
श्री शंकराचार्यांनी बरिच स्तोत्रे लिहली काव्य कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच आचार्यांनी आपल्या काव्यरचनेतून दाखवून दिले आहे.लालित्यपूर्ण रचना ,गेयता अर्थभरित आशय, लय व शब्दसॊंदर्य यामुळे  ती स्तोत्रे पटकन पाठ होतात. माउलि म्हणतात ,"वाचे बरवे कवित्व ।कवित्वी बरवे
 रसिकत्व । रसिकत्वे परतत्व । स्पर्शु जॆसा ॥ याप्रमाणे आचार्याचे काव्य आहे.अल्प वयामध्ये चारहि वेदाचे अध्ययन करुन प्रकांड पंडिताना वादविवादामध्ये हरवले. धर्मध्वज फडकत ठेवला. रुतंभरा प्रद्न्या प्राप्त असलेला हा महात्मा वेदातील तत्वद्न्यान सहज काव्यात प्रगट करतो आहे आणि त्यांनी केलेले स्तोत्रे आजहि लाखो लोकांच्या मुखोद्गत आहेत.
            त्यातीलच एक स्तोत्र अतिशय प्रसिध्द आहे त्याचा सहज समजेल अशा पध्दतीने आपण अर्थ क्रमश: पहाणार आहोत.
     भज गोविन्दं  भज गोविन्दं  भज गोविन्दं  गोविन्दं  भज मुढ्मते ॥
     संप्राप्ते सन्निहिते काले
     नहि नहि रक्षति डुक्रुयरणे \
     भज गोविन्दं  गोविन्दं  भज मुढ्मते  ॥१॥


भावगंध :-                         एक म्हातारा मनुष्य काशीमध्ये गंगेवर घाटावर व्याकरण घोकीत बसला होता,त्याच्या वयाकडे बघुन आचार्यांना नवल वाटले जेव्हा पाठ पाठांतर करावयाचे होते त्या वयात केले नाहि "बालपण गेले नेणता । तरुणपणी विषयव्यथा । व्रुध्दपणी प्रवर्तली चिंता । मरे मागुता जन्म धरी ॥ आणि आयष्याचा शेवट आला आणि हा व्याकरण घोकित बसला .खरे तर आता भगंताचे नाम घेणे श्रेयस्कर असतांना  हा घोकीत बसला कि जे आता पाठांतर होऊ शकत नाहि. म्हणुन आचार्य म्हणतात ,"जेव्हा भगवंताने नियोजित केलेलि वेळ म्ह.म्रुत्युची वेळ येते तेव्हा तु पाठ केलेले व्याकरण तुझ्या रक्षणार्थ येणार नाहित म्हणुन तु त्या गोविंदाचे भजन कर.
                                     जगदगुरू श्री तुकाराम महराज एका अभंगात म्हणतात 
 गोविंद गोविंद। मना लगलिया छंद॥।
 मग गोविंद ते काया ।भेद नाहि देवा तया ॥
          खरे तर माणुस आयुष्यभर शिकत असतो त्याला तसे वाटत नसते हा भग वेगळा ,उच्चविद्याविभुषित माणसास वाटत असते कि आपलि विद्या आपणास तारिल, पण तसे घडत नाहि.उलट अहंकार आडवा येतो तो अहंकार भावनेला स्थान देत नाहि, तो तर्कट वनवतो प्रेमभक्तिला पोषक राह्त नाहि त्यामुळे समाधान मिळत नाहि.चार वेद, सतरा पुराणे , ब्रम्ह्सुत्रे, उपनिषदे संपादन केले परंतु चित्ताची तळमळ शांत झाली नाहि त्यावेळि त्यांना श्री नारद महर्षि नारदांनी भगवान श्रीक्रुष्णाच्या मधुर लिला वर्णन करायला सांगितले , त्याप्रमाणे त्यांनी लिला वर्णन  केल्या त्यामुळे त्यांचे खरे समाधान प्राप्त झाले. म्हणुन हे मानवा तु तर्कट बनण्यापेक्षा गोविंदाचे भजन कर.
                    भजन म्हणजे "भज-भजति म्हणजे भज-सेवया म्ह.सेवा करणे भजन करणे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम ॥  माउलि म्हणतात ," तेथ सेवा हा दारवंठा । तो स्वाधिन करि सुभटा । वोळगोनि ॥ " भगवतप्रप्तिचा मार्ग म्हणजे "भजन " प्रेमाने त्याला आळवणे.
                 तुम्हि करा घट पटा । आम्हि न वजो तया वाटा ॥ तु.म. 
                  घट, पट, वगॆरे परिभाषिक शब्दांच्या जंजाळात आम्हि अडकणार नाहि, कारण
 प्रेमाविण नाहि समाधान । ए.म.॥ म्हणुन हे जीवा तु गोविंदाचेच भजन करुन भगवतप्राप्ति करुन घे.  
                  

No comments: