Monday, March 28, 2016

पंडीत छोड़ो पाथरा(पाथर का देव),
काजी छोड़ो कुराण।
वहः तारीख़ बताई दे,
थे न जमीन आसमांन।
अर्थ - पंडीत और काजी से कबीर साहब ने इस धरतीका(जमीन और आसमांन) निर्माण कब हुवा इसकी तारीख(date) पूँछी है। धर्म के नाम पर भेदभाव करने वालो को कबीर साहब स्पष्ट रूप कहते है की ये भेदभाव मानव निर्मित है।

Sunday, March 27, 2016

भगवंताची स्मृति आणि कर्तव्याची जागृति.
प्रत्येक मनुष्य बोलताना 'मी' आणि 'माझे' अशा भाषेत बोलत असतो; म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतींत काही कर्तव्ये असतात. 'माझे' या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात 'मी' चे कर्तव्य परमेश्वरप्राप्ती हे आहे; आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीति यांना धरून, संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो; म्हणजेच, ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. 'कर्तव्य' याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे, असा आहे. मनुष्याने 'मी' आणि देह या दोहोंच्या बाबतींतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. 'मी' चे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन, असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की, समजा, एखादा मनुष्य नोकरी करीत आहे; तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की, ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंबरक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा, त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही, तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे, 'मी' चे कर्तव्य, म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले, पण देहाचे कर्तव्य, म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तीशी असलेली कर्तव्ये न केली, तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी; आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन, प्रत्येकाने आपली उन्नति करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा, त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे; म्हणजेच, आपण आतबाहेर गोड असावे. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो, पण शेवटी समेवर येतो, त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे; म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे, म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून, म्हणजेच त्याच्या स्मरणात, जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल.
-------------------------------
८८. फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय.
प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत ।
कुळीं उगवत भाग्ययोगें ॥
तें रूप पंढरी उभें असे सानें ।
त्रिभुवनध्यान वेधियेले ॥
उगवली ज्योति प्रभा पैं फाकती ।
नाहीं दीनराती पंढरीये ॥
प्रभात हरपे सायंकाळ लोपे ।
दिननिशी लोपे विठ्ठलप्रभा ॥
पृथ्वी हे ढिसाळ वायु व्योमफळ ।
सेविती अढळ जोडती रया ॥
निवृत्ति सप्रेम जोडती सर्व काळ ।
पंढरी ये राम विश्रामले ॥

तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥
रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥
नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥
तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥

पक्षी अंगणी उतरती |
ते का गुंतोनी राहती ||
तैसे असावे संसारी |
जोवरी प्राचीन्नाची दोरी ||
वस्तीकर वस्ती आला |
प्रातःकाळी उठोनी गेला ||
एकाजनार्दनी शरण |
ऐसे असता भय कवण ||
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती।
रत्नकीळ फांकती प्रभा।
अगणित लावण्य तेज:पुंजाळले।
न वर्णवे तेथेचि शोभा॥🚩
जगाला चालना देणारी मुर्तिमंत शक्ती म्हणजे
आमचा पंढरिशु पांडुरंग परमात्मा
कोणीही या आणि शुद्ध व्हा
इथ भीक मागायची गरजच नाही
शुद्धतेची गरजय
जेवढी शुद्धता आपल्यात येईल
तेवढ ज्ञान अंत:करणात
प्रकाशित होईल
प्रेमाचा प्रसाद मिळेल
ज्ञान आणि प्रेम नसल्यामुळच आपण दु:खीय
संसारात ज्ञान व ईश्वरावर प्रेम असत आणि असच पाहिजेही
पण ते कायम उलट करतात
संसारात प्रेम ठेवतात व
ईश्वराला ज्ञानाने पाहण्याचा
प्रयत्न करतात
आईच्या उदरातील गर्भाला ज्याप्रमाणे आईच्या वयाचं
ज्ञान नसतं
त्याचप्रमाणे आमच्या पांडुरंगाचही आहे
त्याच प्रेम मिळालं तर ते
तृप्त करून जिवाला पुर्ण करतं
सर्वशक्तीचा साक्षात्कार होतो
चैतन्यमय सृष्टी होते
जीव आनंदान न्हाऊन निघतो
नाद विठ्ठल विठ्ठल
ऊठे रोमारोमातुन..
जय मुक्ताई🚩


प्रपंच रचना सर्वहि भोगूनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हरविली । वैराग्याचि निष्ठा प्रगटुनि दाखविली । अहंता ममता दवडुनी निजशांती वरिली ॥ जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा । तारक तु सकळांचा जिवलग सोयरा ॥ हरि भक्तीचा महिमा विशेष वाढविला । विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला । जगदोद्धारा लागी उपाय सुचविला । निँदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥ तेरा दिवस वह्या रक्षूनिया उदकि । कोरड्याची काढुनि दाखविल्या शेखी । अपार कविताशक्ती मिरवुनि इहलोकी । किर्तन श्रवणे तुमच्या उद्धार जन लोकी ॥ बाळवेष घेऊनि श्रीहरि भेटला । विधीचा जनिता तोची आठव हा दिधला । तेणे ब्रह्मानंदे प्रेमे डोलविला । न तुके म्हणोनि तुका नामी गौरविला ॥ प्रयाणकाळि देवे विमान पाठविले । कलिच्या काळामाजी अद्भुत वर्तविले । मानव देह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥