प्रपंच रचना सर्वहि भोगूनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हरविली ।
वैराग्याचि निष्ठा प्रगटुनि दाखविली । अहंता ममता दवडुनी निजशांती वरिली ॥
जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा । तारक तु सकळांचा जिवलग सोयरा ॥
हरि भक्तीचा महिमा विशेष वाढविला । विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला ।
जगदोद्धारा लागी उपाय सुचविला । निँदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥ तेरा
दिवस वह्या रक्षूनिया उदकि । कोरड्याची काढुनि दाखविल्या शेखी । अपार
कविताशक्ती मिरवुनि इहलोकी । किर्तन श्रवणे तुमच्या उद्धार जन लोकी ॥
बाळवेष घेऊनि श्रीहरि भेटला । विधीचा जनिता तोची आठव हा दिधला । तेणे
ब्रह्मानंदे प्रेमे डोलविला । न तुके म्हणोनि तुका नामी गौरविला ॥
प्रयाणकाळि देवे विमान पाठविले । कलिच्या काळामाजी अद्भुत वर्तविले । मानव
देह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संता तोषविले ॥
Sunday, March 27, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment