Sunday, August 23, 2020

 ।। श्री सद्गुरु समर्थ ।।

श्रावण मास साधना सप्ताह, दि. 03.08.2020 सोमवार  -डॉ.सौ.अमृता दात्ये, चिंचवड, पुणे.

कै.मामासाहेब दांडेकरानी म्हणतात मनुष्य हा त्यांच्या ग्रंथात असतोच,म्हणून तो नक्कीच सांपडतो. असच आजपर्यंत अनेक निरुपणकारानी या साधन सप्ताहात विविध वचनामृत, ज्ञानेश्वरी, हिंदी संत पदातून, पु. गुरुदेवांचे विविधांगी चरीत्र वर्णिले आहे. तसेच आज डॉ.सौ.अमृताताईनी ‘’गुरुदेवांचे जीवन दर्शन’’ भारतीय तत्वज्ञानाचे मूळ स्त्रोत – वेदवाङमय, उपनिषद, भ.गीता, ब्रह्मसुत्र, सांख्य योग, यातून घडवितात. आज जगात माहिती तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. ‘साठवण शास्त्र’ आज डिजिटलच्या माध्यमातून होत आहेत. पण निरुपणकारानी आपले सद्गुरु म्हणजे भारतीय मूळ तत्वज्ञानाचे चालते,  बोलते, लिहिते- विध्यापीठ आहे, हे प्रतिपादले आहे.

पु..गुरुदेव जीवघेण्या आजारानी त्रस्त होते. भ.गीतेतील ‘’ मचित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि । ‘’ या भगवत् आश्वासानी दिलासा मिळाला आणि महाराजाच्या कृपेने, आणि त्यांच्या सत्संगतीत राहून आजारातून बरे झाले. 

‘स कालेनेह महता योगो नष्टः परंतप।‘ भ.गीता 4.2 . पु.गुरुदेव म्हणतात, ‘’चांगल्या गोष्टीनाही नाश आहे. म्हणून योगज्ञानाची गंगा फल्गुनदी प्रमाणे गुप्त होते. मग थोर साक्षात्कारी पुरुष त्या ज्ञानाचा पुन्हा प्रसार करतात.’’  ‘लोक विषयलोलुप झाले, त्यांना ईश्वराच्या ज्ञानाची इच्छाच उरली नाही,’ हे योग नष्ट होण्याचे कारण ज्ञानेश्वरानी दिलेले आहे. ‘’तैसी वैराग्याची शीव न देखती.....म्हणोनि योगु हा लोपला। लोकी इये’’।(ज्ञा.4/25-27).  हेही  आता खरे आहे.गुरुदेवांच्या पश्चात  कोणीही साक्षात्कारी संत या संप्रदायात नाही. पु.गुरुदेवांचे निर्गुण स्वरुप वाङमयाच्या रुपाने सगुण होऊन, आणि संजीवन समाधिकडून आजेही नव साधकाना मार्गदर्शक ठरत आहेत. गुरुदेव ठासून सांगतात, ‘’What is Novelty to World – ‘’God Realisation.’’ साक्षात्काराच्या दृष्टीने भगवत्गीतेच महत्व आहे.

आजच्या प्रवचनाचा विषय प्रवेश भगवत्गीतेतील साक्षात्कार दर्शन आणि तत्संबधी उपनिषदातील उतारे उधृत करीत गुरुदेव दर्शन घडवितात. 

1. तत्वदर्शन  2.वेदांत तात्पर्य, -साक्षात्कार. 3. आधुनिक तात्पर्य, 4. चक्रव्युहातून बाहेर पडण्याची गुरुकिल्ली, 5.भव्योदात्त व दिव्य तत्वज्ञानाचे तौलनिक दृष्टीने चर्चा.

भाग पहिला – प्राचीन तत्वदर्शन समालोचन. भगवत्गीतेत उपनिषदाचा सार – सगळ्या उपनिषदातील प्रमुख तत्वदर्शनाचा तपशील.

1.इशोपनिषद – यात प्रामुख्याने कर्मयोगाचा विषय आहे. आणि भगवत्गीतेत सविस्तर चर्चिला आहे. कर्म करुन कर्मबंधनातून मुक्त व्हायचे आहे. फल आशा रहीत कर्म करायचे आहे. म्हणजे कर्मफळाचे बंधन येत नाही. म्हणजे निष्काम करण्याचे महत्व गीतेत प्रतिपादले आहे. 

दुसरा विचार साक्षात्कारासंबधी – ईश मध्ये साक्षात्काराच्या अनुभवाचे वर्णन जवळ जवळ पुर्णतेला गेले आहे. ‘ – ’ तदेजति तन्नेजति’’ ईश.5.ईश्वराचे तेज, रुपाचे, दर्शन आहे.

2.कठोपनिषद – ‘’अश्वत्वं’’ या उदात्त कल्पनेचे मूळ कठोपनिषदात सापडते. ते भगवत्गीतेत अध्याय 15 मध्ये सविस्तर चर्चिले आहे. ‘’उर्ध्वमूलोऽवाक्शाख एषोऽश्वत्थः सनातन’’ आणि भगवत्गीतेत ते अ.15-1 ते 3 श्लोकात असत्य म्हणते, तर कठ म्हणते सनातन – सत्य म्हणते. विचारात भिन्नता आहे. 

3.मुंडकोपनिषद – विश्वरुपता – ही कल्पना भ.गीतेत अध्याय 11 मध्ये सविस्तर चर्चिली आहे. आणि त्याचा संदर्भ पुरुषसुक्तातही सापडतो. ‘’चद्रमा मनसो जातश्चक्षो सुर्याऽजायत ।

दुसरी गोष्ट गीतेत कर्मकांडाविषयी अनुकूल प्रतिकुल आहेत तसेच मंडुकोपनिषदातही आहेत. 

4. छांदोग्य उपनिषद – अंगिरस व देवकीपुत्र – कृष्ण – ही विशेष नामे आली आहेत. नंतर पांच सद्गुणाचा तप, दान, आर्जव, अहिंसा, सत्यवचन विचार आहे. अंतःकाळी ‘’अक्षितमसि, अच्युतमसि, प्राणसंशितमसि या विचाराचे ध्यान करावे असे सांगितले आहे. छांदोग्यातील 5 सद्गुण भ.गीतेच्या अध्याय 16-1.2 आले आहेत. छांदोग्य हे सामवेदाचे उपनिषद आहे. तर गीतेत सामवेदाला सर्व वेदामध्ये उत्तम स्थान दिलेले आहे. 

5. श्वेताश्वतरोपनिषद – राजयोगासंबंधी विचार – योग मार्गाचे आहेत. ते गीतेत 6व्या अध्यायात आलेले आहेत. योगसुत्रावर पतजंली ऋषिनी सविस्तर विचार मांडले आहेत. गीतेत ‘’प्राणापान समेकृत्वा – नामात गुंतून मनाचा संयम आणि नामाने आत्यंतिक सुख मिळते. 

6. सांख्य आणि योग दर्शन वेगळे नाही. .त्रिगुण कल्पना सांख्यातून आलेली आहे. आणि भ.गीतेत अ. 14 मध्ये .गुण विचार आहेत.

7.ब्रह्मसुत्रात – उत्तरायण आणि दक्षिणायन हे दोन विचार आहेत.योग्याला मृत्यु नंतर कोणतीची गति मिळते, संबंधी सुत्र आहे. देवयान  व पितृयान या दोन मार्गाचा उल्लेख ऋग्वेद नंतर उपनिषदे,  व त्यानंतर गीता आणि ब्रह्मसुत्रात आहे. पण ब्रह्मसूत्रात विकास दृष्टीस पडतो. पितृयान पितरांचा मार्ग, उपनिषदात त्यांना अर्चिमार्ग, धूममार्ग ही नांवे दिली आहेत. छांदोग्यमध्ये – श्रध्दा व तप यांची उपासना करतात ते अर्चिमार्गाने जातात व जे यज्ञ दान यांची उपासना करतात ते धूम मार्गाने जातात. गीतेत या मार्गाला शुक्ल-कृष्ण व उत्तरायण –दक्षिणायन म्हणतात. उत्तरायणात मरण येते ते अग्निमार्गाने जातात. दक्षिणायनात मृत्यु येतो ते धूम मार्गाने जातात. कोणत्या काळात मृत्यु येतो त्यावर मोक्ष अवलंबून नाही, तर ज्यांच्या अंगी नैतिक व आध्यात्मिक उन्नतिवर अवलंबून असते. क्षेत्रक्षेत्रज्ञाचा सिध्दांतग्रंथ म्हणजे ब्रह्मसुत्रेच होत.वेद उपनिषदे या खेरीज ब्रह्मसुत्रे हेही ईश्वराचे अस्तित्व सिथ्द करणारे आणखी एक प्रमाण आहे. 

।। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ।।

सोलापूर – 3.08.2020 

भ्रमण ध्वनि - 9921659780


No comments: