Sunday, August 23, 2020

 PRAVACHAN OF RABADE KAKA

।। श्री सद्गुरु समर्थ ।।

श्रावण मास साधना सप्ताह –दि. 28.07.2020 श्री. मोरेश्वर रबडे,पुणे

     श्री. रबडे, निरुपणकारानी भक्तिने साक्षात्कार होतो.त्यासाठी सद्गुरुनी दिलेल्या नामानी अंतःकरणापासून साधना केली असता, दुःखाची तीव्रता कमी होऊन साधना दृढ होऊ लागते. 

     साक्षात्कार हळूहळू/क्रमाक्रमाने/पायरी पायरीने दृढतेने करावे लागते. भक्तिची परमावधी होण्यास दीर्घ काळ लागतो. जस जसी भक्ति ही अंतःकरणापासून दृढतेने होऊ लागते, तसतसे साधकाचा भाव वाढत जातो. प्रेमपुर्वक केलेल्या नामस्मरणामुळे सद्गुरुवर विश्वास वाटू लागतो. त्यातूनच भाव निर्मिती होते. भूमिती श्रेणीने सद्गुरुवर भाव वाढू लागतो. देव भावाचा  भुकेला असतो. मग गुरुकृपेचा वर्षाव भक्तावर होतो. 

     विषय तेथे दुःख आहे. ते जागृतिने बाजूला सारले पाहिजे. विषय वाईट नसतात. पण विषयाचा अतिरेक वाईट,तो टाळावा. त्याची  परिणिती ‘’विषय त्याचा झाला नारायण’’ होतो. भक्ताच्या अंतःकरणात भक्तीची बीज खोलवर रुजु लागतात. भक्तात हळूहळू परिवर्तन घडू लागत. म्हणोनि ज्ञानेश्वर माऊली म्हणते. ‘’झडझडोनी वाहिला निघ । ईये भक्तिचीये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम  माझे।‘’ ईश्वराबद्दल दृढ भावना तीव्र होते. एकविध भक्तिचे वाटे मार्गक्रमण सुरु होते. 

     परमार्थाला पुरक अश्या सर्व आवश्यक गोष्टी परमेश्वर पुरवितो. त्यावेळी आपली सर्व क्रिया/कर्म देवप्राप्तीसाठी वापरावी. अनन्य भक्तिकडे वाटचाल सुरु होते. ‘’मिळोनी मिळतचि असे। समुद्री जळ जैसे । मी होऊनी मज तसै । सर्वस्वे भजती । जो अनन्य यापरी मी जाहला ही माते वरी ।‘’ 

     जेष्ठ साधकाकडून शिकायला मिळते. त्यांचेकडून अनुभव ऐकावे. सद्गुरु बरोबर झालेला संवाद ऐकावा. त्यांची शरणागतिची भावना अवलोकावी. त्यामूळे साधकाची भक्तातील शरणगमन भक्ति दृढ होत जाते. श्री अंबुराव महाराजाना   संसाराची आस होती. पण महाराजानी त्यांच्या अंतःकरणातील गुण ओळखिले.आणि सक्तिने नाम दिले. तत्क्षणी बाबात परिवर्तन होऊन एक भाव/एक दृष्टी ठेऊन अखंड नामस्मरण केले. त्यांच्यात परिवर्तन होऊन सद्गुरुभाव जागृत झाला. डोळ्यापुढे प्रकाशच प्रकाश दिसू लागला. पुज्य गुरुदेव आपले आजार बाजूला सारुन, नाजूक तब्बेत असतानासुध्दा इंचगिरी सारख्या खेड्यात जाऊन महाराजासमवेत सत्संग केला. इतर जेष्ठ साधकांच्या सहवासात त्यांची साधना दृढ होत गेली. महाराज म्हटले की त्यांचा जीव की प्राण. महाराजावरील तीव्र भाव भक्तिने त्यांची तब्बेत सुधारली. भक्तिची उर्जा नामस्मरणाने तीव्र होते.

     दुराचारीसुध्दा साधु होऊ शकतो. उदा. वाल्याचा वाल्मिकी. दरेडोखोर निंबाळला दरोडा घालण्याच्या उद्देशाने आले होते. तेव्हा बाहेर बसलेले दरेडोखोराना पु.गुरुदेवांनी पाहिले. गुरुदेवांनी त्यांना आंत बोलाविले आणि  जेवण दिले. अजाणता त्यांना सद्गुरुच्या हातचा प्रसाद मिळाला. ते गुरुदेवांना म्हणाले, उपजिवेकेसाठी आम्ही चोरी करतो. गुरुदेव म्हणाले , कर्म करा पण कबुल करा. त्यांचा हृदय पालट झाला. आणि उर्वरीत आयुष्यात भाजीपाला विकून उदरनिर्वाह करु लागले. हा सत्संगाचा परिणाम.

      जातपात हे शुद्र विचार मनातून झटकून टाका. त्यातून बाहेर पडा. गुरुदेवांना सर्वाबद्दल अत्यंत प्रिती. आश्रमात दुजाभाव नव्हता. येथे आलेला साधक, अंर्तबाह्य भक्तीने परिपुर्ण भक्त होऊन जातो. देवावरील दृढ भावनेने भक्ताचा इतर पसारा कमी होऊन जातो. विखुरलेला ‘’मी’’ गुरुभक्तित एकाग्र होतो. भक्तीशिवाय जीवन व्यर्थ आहे. अखंड नामस्मरणाने अंतःकरणात भक्ति रुजते. भक्त सद्गुरुबद्दल हळुवार होतो. ‘’ऐसे माझे नामघोषे । अवघे जगति महासुखे । दुमदुमली ।‘’अश्या लीन झालेल्या भक्ताच योगक्षेम देव/सद्गुरु वहातात. श्री गुरुराव देशपांडेना कंत्राटी पध्दतीने नोकरी मिळाली. सुरवातीस एक दोन महिने मिळत असे. कधी कधी मध्येच खंड पडत असे. अश्या विवंचेनात असता, ते शारक्काकडे गेले. ते कथन केले. काळजी करु नका. त्यांचे घरी गुरुदेवापुढे कापूर लावला. घरी आलेवर समजले की त्यांना एक वर्षाच काम मिळाल आहे. गुरुकृपा बरसू लागली. घर अन्नधान्याने भरल. मुलीला पसंति आली. लग्नही ठरल. लग्नात शंकररावानी पुढाकार घेतलल. देव भावाचा भुकेला. भाव हा परमार्थाचा केंद्र बिंदु. पत्र,पुष्प, तोय जरी मनापासून/भक्तिभावाने  अर्पण केल तरी तो स्वीकार करतो. म्हणून भक्तिचे नांवे एकादे फुल तरी भक्तीभावाने अर्पण करावे.

विषय इंद्रिये जड ओळखणे हेचि विरक्ती ।

चैतन्याकडे वृत्ति फिरविणे या नांव भक्ति ।

मी चित्घन वस्तुची प्रचिती शुध्दज्ञान ।

     यावरून ‘’हा देह तुझा असे’’ वाटणे, हेचि विरक्ति, भक्ति, आत्मनिवेदन आणि शरणागति.


।। राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ।।

सोलापूर, दि.28.07.2020, मंगळवार.

COURTSEY VINAYAK KULKARNI

No comments: