श्रावण मास साधना सप्ताह दि.01.08.2020 आणि 02.08.2020 सौ.मिनलताई कुलकर्णी, पुणे यांचे प्रवचन पुष्प यांनी गुंफले. या दोन दिवसात प्रवचन एकाच पदावर असलेने त्याचे एकत्रित सार खालील प्रमाणे आहे.
सद्गुरुरुपी सुर्य (चित्सुर्य) उगवल्यावर खर ज्ञान होते. आणि मायारुपी अज्ञान अंधाराचा नाश होतो. ज्ञानरुपी सुर्याने आत्मबोधाचा लाभ होतो, अस सद्गुरुच स्मरण करुन –नमन करत आजच्या प्रवचनाची सुरवात केली.
आजच्या प्रवचनासाठी त्यांनी तुलसीदासाचे पद –‘’9.The chariot of spiritual victory’’- जेहि जय होइ सो स्यन्दन आना ।। सौरज धीरज तेहि रथ चाका । सत्य, सील दृढ ध्वजा पताका ।।‘’ हे 6 कडव्याचे पद घेतले. त्यावर विस्तृत भाष्य त्यानी निरुपणात केले.
हा विजयरथ, आयुष्य सार्थक करण्यासाठी/परमार्थ प्राप्तीसाठी/अमोलिक लाभासाठी निघाला आहे. या रथाचे वर्णन यथार्थपणे या पदात तुलसीदासाने केले आहे. ह्या रथाचा रथि –चालक – हा भक्तियुक्त अंतःकरणाने हा रथ विजयाच्या दिशेने घेऊन जात आहे. केवळ जीवनातील अत्युच्च ध्येय –जीवन साफल्यासाठी/परमेश्वर प्राप्तीसाठी – भक्तिपुर्ण अंतःकरणाने हा रथ हाकीत आहे. तो पुर्णपणे सावध आहे. त्याची उत्कट ईच्छा देवप्राप्तीचा आहे. एकदा गुरुदेव एका गृहस्थास म्हणाले, जा बाजुच्या खोलीत जाऊन एकच विषयावर उत्कटतेने ½ तास चिंतन कर.आपली उत्कट ईच्छा असेल तर, परमेश्वराव्यतिरीक्त इतर विचार मनात येणार नाहीत. असच या रथीच्या मनात देवप्राप्तीचा विचार आहे. त्या विषयावर तो ठाम आहे. भक्तिभावाने तो परमेश्वराला आळवित घोडदौड करत आहे. पुढे तुलसीदास या रथाच परिपुर्ण वर्णन करतात. प्रामुख्याने परमार्थाला आवश्यक अश्या नीतिमार्गाच अवलंब आवश्यक आहे. या नीति मार्गाची उदाहरणे देत त्याचा तपशील देत आहेत.
रथाच चाक, ज्याच्यावर रथाचा भक्कमपणा आणि वेग अचलंबून आहे ते शौर्य आणि धैर्य आहे. आगेकुच करायला धैर्य लागत. आणि अडथळ्याच्या शत्रुला गारद करण्याला शौर्य लागत. म्हणजे वाटेतील शत्रु नेस्तनाभूत होतील. आणि रथाची आगेकुच वेगाने होईल.
या रथावर कस स्थिर आरुढ व्हायच तर नासाग्री दृष्टी ठेऊन – one pointed नजर आपल्या लक्षावर ठेऊन रथ वेगान ध्येयाच्या दिशेने घेऊन जायच.अन अजिबात विचलीत होऊ द्यायच नाही. देव तुला विजयाच्या दिशेला घेऊन जाणार आहे, असा मनात दृढ विश्वास पाहिजे. ईश्वरीप्रेम संपादून सद्गुरुच्या सहवासात राहून –अलोट कृपा मिळव. तुझ्या अतुट ध्येयावर सद्गुरुकृपा होईल.
तुझ्या रथावर ध्वजस्तंभावर ऐश्वररुपी देवाचा ध्वज फडकत आहे. आणि विजय पताका डौलाने मिरवत आहे.
विजयाकडे धावणा-या या रथाला चार घोडे आहेत.
बल – धष्टपुष्ट, चपळ असा घोडा आहे.
विवेक – दुसरा घोडा विवेकरुपी आहे. तो योग्य मार्गावर आक्रमणाकडे –ध्येयावर लक्ष ठेऊन आहे.
दम – तिसरा घोडा दमदार,समाधान आणि आत्मध्यान यांच्या साहाय्याने सर्व सर्व वाटेतील आडव्या येणा-या शत्रुला नेस्तनाभूत करत रथाचा वेग नियंत्रित करतो. रथीच्या मनातील अचानक उसळणारे विकल्प धीराने बाजूला सारून, रथावर नियंत्रण ठेवणारे, ईश्वरी प्रेमास दम,संयम, अत्यंत आवश्यक ठरतात.
परोपकार – चौथा घोडा परमार्थाला सहाय्यक असा परोपकार गुण आहे. त्याशिवाय भक्तिची गुणवत्ता वाढत नाही, यात – दुस-याच हित जपणे हा उद्देश आहे.
असे विजय रथाचे चार घोडे विजयाकडे कुच करत आहेत.
रथाला बांधण्यासाठी क्षमा,कृपा आणि समतारुपी तीन लडीची पिळदार दोरीने
घोडे रथाला बांधले आहेत.
क्षमा – ही ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या मनाची सुंदर बांधणी/वीण होते.
कृपा – सद्गुरुकृपेने सर्व साध्य होते. प्रसाद लाभतो. त्यामुळे तुमची वाटचाल परमार्थ पथावर तीव्र गतिने घडते.
समता – हा परमोच्च विचार आवश्यक आहे. हा भाव अंतःकरणात दृढ होतो. हे सर्वच सद्गुरुची लेकर आहेत. आपली भावंड आहेत, हा भाव दृढ होतो. कोणीही शत्रु नाही.
हा रथी – रथ चालविणारा ईश्वरचिंतनात आपल सर्वस्व अर्पण करून रथावर आरुढ झालेला आहे. जणू कांही सद्गुरुच रथ चालवित आहेत असा त्याचा विश्वास आहे. श्रध्दा आहे. प्रेयसकडून श्रेयसकडे तो पुर्णपणे वळलेला आहे. गुरुवाक्य हेच त्याच प्रमाण. हेच ध्येय.
विश्वास आणि भाव कसा वाढतो हे गुरुदेवांच जीवनच मार्गदर्शन करत. पु.गुरुदेव अत्यंत प्रकृती क्षीण झालेली होती. 1910 साली ते श्रावण मास सप्ताहात महाराजाबरोबर 6 आठवडे होते. इतर जेष्ठ साधकाबरोबर साधना करत त्यांना सत्संगाचा लाभ झाला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. महाराजावरील विश्वास दृढ झाला. नेमात अतीव समाधान लाभत होते. अशी ही साधना म्हणजे रथाची विजयाकडे वाटचाल. त्या वाटचालीला सद्गुकृपा लाभते. गुरुदेव कृपेविषयी म्हणतात,’’ Grace is not justice but it is more super jistice’’.
यम/नियम – रथीच्या पाठीवर भात्यात यम, नियमाचे बाण आहेत. हे बाण क्वचित प्रसंगी वापरायचे आहेत. केवळ धाक दाखविण्यासाठी वापरायचे आहे. प्रेमाने शत्रुला –नव्हे केवळ अडथळे आणणा-याला – दूर सारायचे आहे. यात तुमच्या सहनशीलतेची, भक्तिची कसोटी आहे.
सद्गुरुकृपा लाभून हा रथि विजय मार्गाकडे कूच करीत आहे.
पु.गुरुदेव म्हणतात, The spiritual Master is the impenetrable amour of the warrior which no arrows can pierce, and which might therefore be called in the inimitable equipment in his victorious journey through life. एहि सम विजय उपाय न दूजा ।‘’
अमानित्वावर गुरुदेवांचे दर्शन नव साधकाना कसे घडले. ती घटना. सौ. वसुधा मोडक प्रथमच निंबाळला आले होते. त्यानी पुर्वी कधीहि गुरुदेवांना पाहिले नव्हते.त्यांच्या कल्पनेतले गुरुदेव वेगळेच होते. ते रुबाबदार/भारदस्त व्यक्तित्व असतील. ते जागतिक किर्तीचे तत्वज्ञ होते. त्यांच आगमन जयजयकारात होईल. सर्वजण त्यांना नमस्कार करतील. आगमनाची आतुरतेने वाट बघत होते. पण सिटिंग सुरु झाले. सर्वाचे लक्ष एका व्यक्तिकडे होते. ती कृश होती. सर्वजण त्यांना संबोधित होते. त्यावरुन त्यांनी गुरुदेवच असतील हे ताडले. किती लीनता मोठेपणाचा लवलेशही नाही. नमस्कार करुन घेण नाही. अशी ही संताची वृत्ति असते. साधेपणा असतो. अश्या वृत्तिचे सद्गुरु हा विजय रथ चालविण्यास प्रोत्साहीत करतात. असा महत्भाग्याने आपणाला सद्गुरु लाभले, कृपारुपी नाम मिळाले.आपण साधनारुपी पुष्पहार गुंफून त्याना शरणगमनवृत्तिने प्रार्थना करत हा हार त्याना अर्पण करु या. असच आमच्यावर कृपादृष्टी बरसू दे.
सोलापूर, 2.08.2020
भ्रमणध्वनि -9921659780.Courtsey Vinayak kulkarni
No comments:
Post a Comment