Tuesday, April 12, 2016

भक्तॠणी देव बोलती पुराणें ।
निर्धार वचनें साच करीं ॥1॥
मागें काय जाणों अइकिली वार्त्ता ।
कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥
माघारिया धन आणिलें घरासि ।
न घे केला त्यासि त्याग तेणें ॥2॥
नामदेवाचिया घरासि आणिलें ।
तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥3॥
प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण ।
एकोबाचें ॠण फेडियेलें ॥4॥
बीज दळोनियां केली आराधना ।
लागे नारायणा पेरणें तें ॥5॥
तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार ।
नाडला साचार तोचि एक ॥6॥
 

No comments: