Tuesday, April 12, 2016

सुखें होतो कोठे घेतली सुती ।
बांधविला गळा आपुले हातीं ॥1॥
काय करूं बहु गुंतलों आतां ।
नये सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥
होते गांठी तें सरलें येतां ।
आणीक माथां रीण जालें ॥2॥
सोंकरिलियाविण गमाविलें पिक ।
रांडापोरें भिके लावियेलीं ॥3॥
बहुतांचीं बहु घेतलीं घरें ।
न पडे पुरें कांहीं केल्या ॥4॥
तुका ह्मणे काही न धरावी आस ।
जावे हे सर्वस्व टाकोनिया ॥5॥

 

No comments: