Wednesday, April 6, 2016

देव आड जाला । तो भोगिता मी उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥१॥
जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥
विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥२॥
अवघी एकाची च वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥३॥
प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥४॥
अर्थ :- मी परमार्थ मार्ग अनुसारला म्हणून माझ्या प्रापंचिक सूखदुःखाच्या आड़ प्रतक्ष परमेश्वर आला आणि तोच सर्व भोग भोगू लागला ; त्यामुळे मी त्या त्रासापासुन मुक्त झालो ।।1।।

No comments: