Friday, April 8, 2016

● धन्य तुकोबा समर्थ ●
अणुरेणियां थोकडा ।
तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिलें कलेवर ।
भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी ।
दीप उजळला घटीं ॥३॥
तुका ह्मणे आतां ।
उरलो उपकारापुरता ॥४॥
आह्मी जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हेचि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥
 आम्ही जातो तुम्ही कृपा असु द्यावी||
सकळा सांगावी विनंती माझी||
वाढ वेळ झाला उभा पांडुरंग||
वैकुंठा श्रीरंग बोलावितो||
अंतकाळी विठो आम्हासी पावला||
कुडी सहित झाला गुप्त तुका|

पांडुरंगा पांडुरंगा | मी पतंग तुझ्या हाती धागा || धृ ||
पंचतत्वाचा केला पतंग | धागा लाविला निळा रंग || १ ||
साही शास्त्रांचा सुटला वारा | चारी वेदांचा आधार त्याला || २ ||
तुका म्हणे मी झालो पतंग | धागा आवरा हो पांडुरंग || ३ ||

 

No comments: