Tuesday, April 5, 2016

लाहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥1॥
ऐरावत रत्न थोर ।
तया अंकुशाचा मार ॥2॥
ज्याचे अंगीं मोठेपण ।
तया यातना कठीण ॥3॥
तुका म्हणे जाण ।
व्हावें लहानाहुनि लहान ॥4॥

। ॐ विष्णवे नमः ।
 

No comments: