Tuesday, April 5, 2016

जरी कल्मषाचा आगरु।तूं भ्रांतीचा सागरु।व्यामोहाचा डोंगरु।होउनी अससी।।तर्‍ही ज्ञानशक्तीचेनि पाडें।हें आघवेंचि गा थोकडें।ऐंसे सामर्थ्य असे चोखडें।ज्ञानीं इये।। ज्ञा.४ १७२-१७३
 पुजा देवाची असो वा सदगुरूची
त्यासाठी काही ना काही तरी साहित्य सामुग्री लागतेच
देवाला अर्पण करण्यासाठी शबरीकङे बोरे तरी होती
गजेंद्राला घाईघाईत कमळ तरी मिळाले
द्रौपदीच्या थाळीला भाजीच ऐक पान तरी चिटकलेले होते
रुक्मिणी आईसाहेबाना तुलसीदळ मिळाले
उभ्या गावातुन मधुकरी गोळा करून परममित्राच्या भेटीला जाताना सुदामदेवानी मुठभर पोहे तरी भेट दिले
रंतीदेवाने भगवंताला घोटभर पाणी तरी दिले
साडेतीनशे वर्षापुर्वी तुकोबारायानी भगवंताला मुखशुद्धीसाठी तुलसीदल दिले
देवाच्या वा सदगुरूच्या पुजेसाठी काहीनाकाही लागतेच
परंतु
आपल्या जवळ जर काहीच चीजवस्तू नसेल तर देवाची वा सदगुरूची पुजा करावी ती मनाने
यास मानसपुजा असे म्हणतात
आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून त्यावर श्रीगुरूदेवाच्या चरण कमलाची स्थापना करावी
आपले सदगुरू व आपन ऐक ऐकच आहोत
अशी ऐक्यतेच्या समजुतरूपी ओंजळीत सर्व इंद्रीयरूपी कमळकळ्या भरून त्या भाव पुष्पांजलीच अर्ध्य सदगुरूच्या चरणावर द्याव
एकनिष्ठारूपी निर्मळ पाण्याने सदगुरूच्या चरणावर जलाभिषेक करावा
सदगुरू विषयी आपल्या वासनेच्या बोटाने पादुकाना गधं लावावा
सदगुरूविषयीच प्रेमरूपी सोन शुद्ध करून त्याचे घागर्याचे वाळे बनवून सुकूमार सदगुरूच्या पायात घालावे
अनन्य प्रेमाची जोङवी पायाच्या अंगठ्यात घालावी
आनदंरूपी सुवास देणारे अष्टसात्वीक भावाचे कमळ सदगुरूच्या पायावर वहावे
अंहकाराचा धुप जाळावा
निरभीमान वृत्तीच्या तेजाने श्री सदगुरूस आरती ओवाळावी
तदाकार वृतीच आलिंगन द्यावे
आपले शरीर व प्राण याच्या खङावा करून सदगुरूच्या चरणी अर्पण कराव्या
तसेच भोग व मोक्षही सदगुरूच्या चरणी ओवाळून टाकावा
विश्व माऊली ज्ञानोबारायानी आपले सदगुरू निवृतीनाथ दादा यांची ज्ञानेश्वरीत केलेली हि मानसपुजा
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें ।
वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥ १ ॥
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी ।
भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥ २ ॥
अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ ।
ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥ ३ ॥
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें ।
लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥ ४ ॥
घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी ।
तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥ ५ ॥
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ ।
तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥ ६ ॥
तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं ।
सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥ ७ ॥
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण ।
करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥ ८ ॥
इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा ।
जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥ ९ ॥
काही न लगे ऐक भावची कारण !
तुका म्हणे आन विठोबाची !!
अवघ्या उपचारा !
एक मनची दातारा !!
अशी ही आपली
ते हे माय ज्ञानेश्वरी

No comments: