Sunday, April 3, 2016

सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ।।
शिवपीठ हे जुनाट । ज्ञानाबाई तेथे मुगुट ।।
वेद शास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ।।
ज्ञानाबाईंचे चरणी । शरण एकाजनार्दनी ।।

कळेल हें तैसें गाइऩन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥1॥
करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥
होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥2॥
काय करूं कळा युHी या कुसरी । जाणिवेच्या परी सकिळका ॥3॥
तुका ह्मणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥4॥

No comments: