Monday, April 4, 2016

जेथें वेदा न कळे पार ।
पुराणासी अगोचर ॥ १ ॥
तो हा पंढरीराणा ।
बहु आवडतो मना ॥ २ ॥
सहा शास्त्र शिणलीं ।
मन मौनचि राहिली ॥ ३ ॥
सेना म्हणे मायबाप ।
उभा कटी ठेउनी हात ॥ ४ ॥

 

No comments: