कापुराचे थलीव ।
नुरेचि आगीची बरव ।
नुरेचि रूप नाव ।
तैसे यया ।।
🍀श्रीज्ञानदेव म्हणतात की कापुरापासून सुंदर अलंकार केले की त्या कोरीव अलंकारांच आपण कौतुक निश्चितपणे करतो .ते अलंकार अग्नीच्या सहवासात आले नाहीत तोपर्यंत कापुराच्या अलंकाराचं वैभव नेत्र अनुभवत राहतील. ते अलंकार वाणीचा विषय ठरतील .पण एक लक्षात घ्या की त्या कोरीव अलंकारांना एकदा का ज्वालेने आलिंगन दिले की ज्वाला क्षणभर देखणी दिसेल आणि ते कोरीव अलंकार अग्नीमध्ये विरघलून जातील .त्या कापुराच्या अलंकारांची लहानशी भस्मखूण सुध्दा मागे शिल्लक रहाणार नाही. तसेच शिष्य जेव्हा सद्गुरूंच्या सहवासात येतो, सद्गुरू आपल्या परमशिष्याला जेव्हा गाढ आलिंगन देतो तेव्हा तो परमशिष्य सद्गुरुमय होऊन जातो .शिष्याच्या नामाची नावनिशाणीसुध्दा मागे रहात नाही .सद्गुरू त्याला नामविरहित करून टाकतो . श्रीज्ञानदेव म्हणतात की शिष्य हा नामस्मरणात दंगझाला आहे , नामस्मरणात तेजालून उठतो आहे हे सौंदर्य वैभव आजूबाजूच्या लोकांना तोपर्यंतच आश्चर्याचा विषय होईल जोपर्यंत शिष्य सद्गुरूत विलिन झाला नाही ..... म्हणजे देखणा कापूर आणि नामरूपात चमकणारा शिष्य ह्यांचे अस्तित्व भुलवते हे खरे आहे .परंतु अस्तित्वरहित होणे हा दोघांचाही मूलत: गुणधर्मच आहे .

No comments:
Post a Comment