Thursday, April 14, 2016

इतुलेँ करि भलत्या परी ।
परद्रव्य परनारी ।
सांडुनी अभिलाष अंतरी ।
वर्ते वेव्हारीँ सुखरुप ॥
न करि दंभाचा सायास ।
शांती राहे बहुवस ।
जिव्हे सेवीँ सुगंधरस ।
न करी आळस रामनामीँ ॥
जनमित्र होई सकळांचा ।
अशुभ न बोलावी वाचा ।
संग न धरावा दुर्जनाचा ।
करीँ संतांचा सायास ॥
करिसी देवाविण आस ।
अवघी होईल निरास ।
तृष्णा वाढविसी बहुवस ।
कधी सुखास न पवसी ॥
धरुनी विश्वास करिँ धीर ।
करीता देव हाचि निर्धार ।
तयाचा वाहे योगक्षेमभार ।
नाहि अंतर तुका म्हणे ॥

 

No comments: