Tuesday, April 12, 2016

जोडोनिया धन उत्तम वेव्हारें।
उदास विचारें वेंच करी॥
उत्तमची गती तो एक पावेल।
उत्तम भोगेल जीव खाणी॥
परउपकारी नेणे परनिंदा ।
परस्त्रिया सदा बहिणी माया॥
भूतदया गाई पशूंचे पालन।
तान्हेल्या जीवन वनामाजी॥
शांतिरुपें नव्हे कोणाचा वाईट।
वाढवी महत्त्व वडिलांचे॥
तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फळ।
परमपद बळ वैराग्याचें॥
 

No comments: