Sunday, April 10, 2016

एकतत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥ १

तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे
आधीं ॥ २ ॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिक
पंथा जाशील झणी ॥ ३ ॥
ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे
सदा ॥ ४ ॥


चित्‍ती तुझे पाय डोळां रुपाचें ध्‍यान । अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हेचि एक तुम्‍हां देवा मागतो मी दातारा । उचित ते करा भाव जाणोनी खरा ॥२॥
खुंटले जाणीव माझे बोलणे आतां । कळों येईल तैसी करा बाळाची चिंता ॥३॥
तुका म्‍हणे आतां नको देऊ अंतर । न कळे पुढे काय कैसा होईल विचार ॥४॥
 

No comments: