।। श्रीपांडुरंगाष्टकम् ।।
महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीद्रैः । समागत्य तिष्टंतमानंदकदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ १ ॥
भीमानदीच्या तीरावर महायोगाचे अधिष्ठान असलेल्या पंढरपूर क्षेत्रांत पुंडरीकाला वर देण्या करीता श्रेष्ठ मुनींनसह येऊन तिष्टत असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् । वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ २ ॥
ज्याची वस्त्रे विद्दुलतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत, ज्याची अंगकांती नील मेघाप्रमाणे शोभत आहे, जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ व भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभा आहे अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ३ ॥
मला अनन्यभावाने शरण येणार्या भक्तांना भवसागर हा फक्त कमरेइतकाच खोल आहे, तो सहज पार करता येतो, हे सांगण्याकरता त्याने कमरेवर हात ठेवले आहेत. ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभिस्थान जितके उंच आहे त्यापेक्षा अधिक दूर नाही हे दाखवण्यासाठी त्याने आपली बोटे नाभिस्थानाकडे वळवली आहेत अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् । शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ४ ॥
आपल्या गळ्यांत कौस्तुभमणी घातल्याने जो अतिशय शोभून दिसत आहे, ज्याच्या बाहूंवर केयूर म्हणजे बाजूबंद शोभत आहेत, ज्याच्या जवळ श्री म्हणजे लक्ष्मीचा निवास आहे, जो लोकांचा पालनकर्ता आहे, अशा त्या परमशांत मंगलमय सर्वश्रेष्ठ व स्तुति करण्यास योग्य असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो.
शरच्चंद्रबिबाननं चारुहासं लसत्कुंडलक्रान्तगंडस्थलांगम् । जपारागबिंबाधरं कंजनेत्रम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ५ ॥
शरदऋतूंतील चंद्रबिम्बाप्रमाणे अत्यंत रमणीय मुख असलेल्या, मुखावर सुंदर हास्य विलसत असलेल्या, कानांत कुंडले घातल्याने त्यांची शोभा गालावर झळकत असलेल्या, ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्ण असलेल्या व कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
किरीटोज्ज्वलत्सर्वदिक् प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरमर्घ्यैः ।
त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ६ ॥
ज्याच्या मस्तकावर असलेल्या मुकुटाच्या प्रभेने मुखाभोवतालच्या सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, दिव्य आणि अमूल्य रत्ने अर्पण करुन देव ज्याची पूजा करतात, बाळकृष्णरुपाने जो तीन ठिकाणी वाकून उभा आहे, ज्याच्या गळ्यात वनमाला व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभत आहे त्या आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेषं दधानम् । गवां वृंदकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ७ ॥
सर्व विश्र्व व्यापून राहणार्या, वेणु वाजवीत वृन्दावनात फिरणार्या, ज्याचा कोणाला अतं लागत नाही, लीलेने गोपवेष धारण केलेल्या, गायींच्या कळपाला आनंद देणार्या मधुर हास्य करणार्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो....
अजं रुक्मिणीप्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् । प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥ ८ ॥
ज्याला जन्म नाही, जप रुक्मीणीचा प्राणाधार आहे, भक्तांसाठी परम विश्राम-धाम व शुद्ध कैवल्य असलेल्या, जागृति, स्वप्न व सुषुप्ति किंवा बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या तीनही अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, नेहमी प्रसन्न, शरणागतांचे दुःख हरण करणारा व देवांचाही देव असलेल्या अशा आनंदकंद परब्रह्मरुप पांडुरंगास मी भजतो...
स्तवं पांडुरंगस्य वै पुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।
भवांबोनिधिं तेऽपि तीर्त्वाऽन्तकाले हरेरालयं शाश्र्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥
अत्यंत पुण्यदायक असलेले, पांडुरंगाचे हे स्तोत्र जे कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक नित्य पठण करतील ते सर्वजण अन्तकाळी भवसागर सहजपणे तरुन जातील आणि त्यांना परब्रह्म-स्वरुप श्रीहरीच्या-पांडुरंगाच्या शाश्र्वत स्वरुपाची प्राप्ती होईल...
॥ इति श्री परम पूज्य शंकराचार्यविरचितं श्रीपांडुरंगाष्टकं संपूर्णम ॥

No comments:
Post a Comment