Wednesday, April 20, 2016

विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरिलि ॥१॥
विठ्ठलविठ्ठल भावें म्हणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥
बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥२॥
तुका म्हणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥३॥
 

No comments: