Friday, April 22, 2016

विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ।।
आदिनाथापासून । परंपरा आली जाण ।।
ज्ञानदेवा ज्ञान दिले । चांगदेवातें बोधिलें ।।
तोचि बोध माझे मनीं । राहो एका जनार्दनी ।।

मेळवोनी मेळा गोपाळांचा हरी ।
निघे करावया चोरी गोरसाची ।।
धाकुले सवंगडे घेऊनी आपण ।
चालती रामकृष्ण चोरावया ।।
ठेवियले लोणी काढती बाहेरी ।
खाती निरंतरी सवंगडी ।।
एका जनार्दनी तयाचे कौतुक ।
न पडे ठाऊके ब्रह्मादिका ।।

No comments: