भोगें घडे त्याग ।
त्यागें अंगा येती भोग ॥1॥
ऐसें उफराटें वर्म ।
धर्मा अंगींच अधर्म ॥ध्रु.॥
देव अंतरे तें पाप ।
खोटे उगवा संकल्प ॥2॥
तुका म्हणे भीड खोटी ।
लाभ विचाराचे पोटीं ॥3॥
युक्ताहार न लगे आणिक साधनें ।
अल्प नारायणें दाखविलें ॥1॥
कलियुगामाजी करावें कीर्तन ।
तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार ।
घ्यावें वनांतर भस्म दंड ॥2॥
तुका म्हणे मज आणि उपाव ।
दिसती ते वाव नामेंविण ॥3॥
बोलिलों तें कांहीं तुमचिया हिता ।
वचन नेणतां क्षमा कीजे ॥1॥
वाट दावी तया न लगे रुसावें ।
अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥
निंब दिला रोग तुटाया अंतरीं ।
पोभाळितां वरि आंत चरे ॥2॥
तुका म्हणे हित देखण्यासि कळे ।
पडती आंधळे कूपा माजी ॥3॥
शुकसनकादिकीं उभारिला बाहो ।
परिक्षितीला हो दिसां सातां ॥1॥
उठाउठी करी स्मरणाचा धांवा ।
धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥
त्वरा जाली गरुड टाकियेला मागें ।
द्रौपदीच्या लागें नारायणें ॥2॥
तुका म्हणे करी बहु च तांतडी ।
प्रेमाची आवडी लोभ फार ॥3॥
त्यागें अंगा येती भोग ॥1॥
ऐसें उफराटें वर्म ।
धर्मा अंगींच अधर्म ॥ध्रु.॥
देव अंतरे तें पाप ।
खोटे उगवा संकल्प ॥2॥
तुका म्हणे भीड खोटी ।
लाभ विचाराचे पोटीं ॥3॥
युक्ताहार न लगे आणिक साधनें ।
अल्प नारायणें दाखविलें ॥1॥
कलियुगामाजी करावें कीर्तन ।
तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥
न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार ।
घ्यावें वनांतर भस्म दंड ॥2॥
तुका म्हणे मज आणि उपाव ।
दिसती ते वाव नामेंविण ॥3॥
बोलिलों तें कांहीं तुमचिया हिता ।
वचन नेणतां क्षमा कीजे ॥1॥
वाट दावी तया न लगे रुसावें ।
अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥
निंब दिला रोग तुटाया अंतरीं ।
पोभाळितां वरि आंत चरे ॥2॥
तुका म्हणे हित देखण्यासि कळे ।
पडती आंधळे कूपा माजी ॥3॥
शुकसनकादिकीं उभारिला बाहो ।
परिक्षितीला हो दिसां सातां ॥1॥
उठाउठी करी स्मरणाचा धांवा ।
धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥
त्वरा जाली गरुड टाकियेला मागें ।
द्रौपदीच्या लागें नारायणें ॥2॥
तुका म्हणे करी बहु च तांतडी ।
प्रेमाची आवडी लोभ फार ॥3॥
No comments:
Post a Comment