Tuesday, April 12, 2016

विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव ।
कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं ।
उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता ।
विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥
विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन ।
सोयरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा ।
नश्वरित गांवा जाइन त्याच्या ॥४॥
 

No comments: