या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥
गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥
सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥२॥
प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥३॥
पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी ॥४॥
तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥तौ
No comments:
Post a Comment