धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥
तें हें ब्रह्म विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥
अंतर व्यापी बाहे । धांडोिळतां कोठें नोहे ॥2॥
योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥3॥
दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥4॥
अवघी लीळा पाहे । तुका ह्मणे दासां साहे ॥5॥
No comments:
Post a Comment