Friday, April 15, 2016

विरंचीचा बाप क्षीरसागरावासी।
ध्याती योगी त्यासी निरतंर॥
परेहूनिपर वैखरीहूनि दुरी।
कौसल्येचे उदरीं तोचि असे॥
बोलियेलें जें जें नव्हे असत्य वाणी।
न येऊं दे मनीं शंका कांहीं॥
माझें हें संचित धन्य धन्य आतां।
पाहीन मीं कांता लक्षुमीच्या॥
धन्य धन्य धन्य अयोध्येचे लोक।
वैकुंठनायक पाहतील॥
धन्य पशुपक्षी श्वापदें तरूवर।
राजा रघुवीर पाहातील॥
त्रैलोक्यांत धन्य तूंचि एक नृपा।
नामयाच्या बापा पाहाशील॥
 

No comments: