Friday, April 15, 2016

आनंदले लोक नरनारी परिवार |
शंख भेरीतुरें वाद्यांचे गजर ||
आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ |
अवघा जयजयकार आळंगिला भरत ||
करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा |
लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ||
झालें रामराज्य आनंदलीं सकळें |
तुका म्हणे गाईंवत्सें नरनारी बाळें ||


No comments: