Tuesday, April 12, 2016


तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥1॥
सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हा चि मनीं ॥ध्रु.॥
आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥2॥
प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥3॥
तुका ह्मणे आतां कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥4॥
तां कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥4॥

No comments: