Thursday, April 14, 2016

उठा उठा हो वेगेंसी ।
चला जाऊं पंढरीसी ।
भेटों विठ्ठ्ल-रखुमाईसी ।
त्रिविधताप हरतील ॥
चंद्रभागे करु स्नान ।
घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन ।
तेणे मन निवेल ॥
गंगा यमुना सरस्वती ।
कृष्णा वेण्या भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती ।
येती श्रीपतिदर्शना ॥
तापी नर्मदा कावेरी ।
पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बाहेरी ।
महादोश हरतील ॥
रामानंदाचे माहेर ।
क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्र्वंभर ।
पैलपार तरतील ॥ 


No comments: