Friday, April 8, 2016



उध्दवाने रचिला पाया । रामदास देवालया देवालया ॥ध्रु०॥
अवघे शिष्यवृंद ज्याला । चीर लागे हो ज्याला ॥१॥
भीम दिनकर गिरिधर । खांब शोभताती सुंदर ॥२॥
वेणु अक्का दिपमाळा । ज्ञानवल्लीने सोज्वळा ॥३॥
कळस कल्याण साजिरा । रामदासाच्या मंदिरा ॥४॥
बाळ तयाचा किंकर । सदा झाडी महाद्वार ॥५॥

रचना - समर्थभक्त नानासाहेब देव उर्फ कवि किंकर

No comments: