सत्य संकल्पाचा दाता नारायण ।
सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथें अळंकार शोभती सकळ ।
भावबळें फ़ळ इच्छेचें तें ॥२॥
अंतरीचें बीज जाणॆं कळवळा ।
व्यापक सकळां ब्रह्यांडाचा ॥३॥
तुका म्हणे नाहीं चालत तांतडी ।
प्राप्त काळघडी आल्यावीण ॥४॥
सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथें अळंकार शोभती सकळ ।
भावबळें फ़ळ इच्छेचें तें ॥२॥
अंतरीचें बीज जाणॆं कळवळा ।
व्यापक सकळां ब्रह्यांडाचा ॥३॥
तुका म्हणे नाहीं चालत तांतडी ।
प्राप्त काळघडी आल्यावीण ॥४॥
No comments:
Post a Comment