विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥
तयासी बोलतां होईंल विटाळ । नेव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥
विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥

तुका म्हणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥
अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आंता । चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥१॥
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथाचा नाथ जनार्दन ॥२॥
एका जनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभतसे ॥३॥

No comments:
Post a Comment