Friday, April 8, 2016

निमिष नलगे मन वेधितां ।
येवढी तुझी स्वरुपता ॥१॥
विठोबा नेणॊ कैसी भेटी ।
उरणें नाहीं जीवेसाठीं ॥२॥
उरणें उपाधि कारणें ।
तें तों नेमिलें दर्शनें ॥३॥
निवृत्तिदासा वेगळें ।
सांगावया नाहीं उरलें ॥४॥

 

No comments: