फ़िरविलें देऊळ जगामाजी ख्याती ।
नामदेवा हातीं दूध प्याला ॥१॥
भरियेली हुंडी नरसी मेहेत्याची ।
धनाजी चाट्याचीं शेतें पेरी ॥२॥
मीराबाईसाठीं घेतो विष प्याला ।
दामाजीचा झाला पाडेवार ॥३॥
कबीराचे मागीं विणूं लागे शेले ।
मूल उठविलें कुंभाराचें ॥४॥
आतां तुम्ही दया करा पंढरीराया ।
तुका विनवी पायां वेळोवेळां ॥५॥
नामदेवा हातीं दूध प्याला ॥१॥
भरियेली हुंडी नरसी मेहेत्याची ।
धनाजी चाट्याचीं शेतें पेरी ॥२॥
मीराबाईसाठीं घेतो विष प्याला ।
दामाजीचा झाला पाडेवार ॥३॥
कबीराचे मागीं विणूं लागे शेले ।
मूल उठविलें कुंभाराचें ॥४॥
आतां तुम्ही दया करा पंढरीराया ।
तुका विनवी पायां वेळोवेळां ॥५॥
No comments:
Post a Comment